हिंगोलीत मकरसंक्रांतीला पतंग उडविण्याची परंपरा कायम,आमदार बांगरांचाही सहभाग | Makar Sankrant Festival | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Santosh Bangar

हिंगोलीत मकरसंक्रांतीला पतंग उडविण्याची परंपरा कायम,आमदार बांगरांचाही सहभाग

हिंगोली : हिंगोली शहरात अनेक वर्षांपासून मकरसंक्रांतीला पंतग उडविण्याची परंपरा आहे. ती आजही कायम असुन शुक्रवारी (ता.१४) मकरसंक्रांती निमित्त आमदार संतोष बांगर यांनी देखील यात सहभाग घेत घराच्या गच्चीवर जात पंतग उडविण्याचा आनंद घेत अनेकांचे पंतग देखील काटले आहे. आमदार आणि राजकीय नेते म्हटलं की, त्यांचा तो बिझी शेड्युल, उद्घाटन सोहळे, सत्कार समारंभ , कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, नेहमी हेचं बघायला मिळतं. या मुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनावरील आवडी-निवडीवर काहीसा परिणाम होतो. परंतु असं होऊ न देता वेळातला वेळ काढून पतंग उडविण्याची इच्छा व हौस पूर्ण करण्यासाठी आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी शुक्रवारी स्वतःच्या घराच्या गच्चीवरुन कार्यकर्त्यांसमवेत पतंग उडविण्याचा आनंद घेतला. (Kites Festival Still Continue In Makar Sankrant In Hingoli, Santosh Bangar Also Participated)

हेही वाचा: पत्रकार कमाल खान यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

यावेळी त्यानी राजकारणातील नव्हे तर प्रत्यक्ष काही पतंगाची काटाकाटी केल्याचे चित्र बघायला मिळाले. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बांगर यांनी पतंग उडविण्याचा आनंद घेत सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मकरसंक्रात आणि पतंगबाजीचे अनोखे नाते आहे. रंगीबेरंगी विविध आकारातील पतंग (Hingoli) उडविण्यात वेगळाच आनंद असतो. हा प्रत्यक्ष आनंद हा या आमदारांनी घेतला आहे. मकरसंक्रात (Makar Sankrant) सर्वत्र कोरोनाच्या सावटाखाली साजरी होत आहे. पतंग उडवताना उत्साहाच्या भरात स्वतःची काळजी घ्यावी व इतरांनाही दुखापत होणार नाही. याची काळजी घेण्याचे आवाहन करीत संतोष बांगर यांनी जनतेला मकरसंक्रातीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top