आमदार भिसेंच्या मुलावर चाकूहल्ला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जून 2019

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. त्र्यंबक भिसे यांच्या मुलावर शेतीच्या वादातून सोमवारी (ता. तीन) रात्री चाकूहल्ला झाला. याबाबत रेणापूर पोलिसांत मंगळवारी (ता. चार) गुन्हा दाखल झाला.

रेणापूर - लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. त्र्यंबक भिसे यांच्या मुलावर शेतीच्या वादातून सोमवारी (ता. तीन) रात्री चाकूहल्ला झाला. याबाबत रेणापूर पोलिसांत मंगळवारी (ता. चार) गुन्हा दाखल झाला.

आमदार भिसे यांचे भोकरंबा (ता. रेणापूर) हे मूळगाव असून येथे त्यांची शेती आहे. त्यांच्या बांधाला लागून श्रीकिशन भिसे यांचे शेत आहे. या दोघांत बांधावरून दोन वर्षांपासून वाद सुरू आहे. सोमवारी (ता. तीन) रात्री दहाच्या दरम्यान आमदार भिसे यांचे पुत्र विश्वजित हे शेतात नांगरणी सुरू असल्याने गेले होते. आमच्या शेतात अतिक्रमण का केले म्हणून त्यांनी श्रीकिशन भिसे यांच्याशी विचारणा केल्यानंतर दोघांत शाब्दिक बाचाबाची होऊन वाद वाढला व यातच हाणामारी सुरू झाली. यात आमदार भिसे यांचे पुत्र विश्वजित यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

या हाणामारीत आणखी पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. याबाबत रेणापूरचे पोलिस निरीक्षक गोरख दिवे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की शिवाजी भिसे यांच्या फिर्यादीनुसार श्रीकिशन भिसे, अमोल भिसे, स्वप्नील भिसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Knief Attack on Mla Trimbak Bhise Son Crime