उस्मानाबादमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

उस्मानाबाद जिल्ह्यातील नायगाव पाडोळी येथे शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी निंबाळकर गेले होते. यावेळी त्यांना भेटण्यासाठी आलेल्या अजिंक्य टेकाळे या युवकाने त्यांच्यावर चाकूहल्ला केला. त्याने चाकू लपवून त्यांच्यावर हल्ला केला.

उस्मानाबाद : उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर एका युवकाने आज (बुधवाऱ) सकाळी चाकूहल्ला झाला. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद जिल्ह्यातील नायगाव पाडोळी येथे शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी निंबाळकर गेले होते. यावेळी त्यांना भेटण्यासाठी आलेल्या अजिंक्य टेकाळे या युवकाने त्यांच्यावर चाकूहल्ला केला. त्याने चाकू लपवून त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले असून, दुखापत किरकोळ असल्याचे बोलले जात आहे.

या हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. हल्ल्यामागील नेमके कारण समजू शकले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: knife attack on MP Omraje Nimbalkar in Osmanabad