आरोपीची खंडपीठात माघार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - कोपर्डी (जि. नगर) अत्याचार प्रकरणातील गुन्ह्यातून वगळावे, अशी विनंती करणारी याचिका संशयित आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. न्या. झेड. ए. हक यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत याचिका फेटाळली जात असल्याचे लक्षात येताच आरोपीने माघार घेतली.

नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे 13 जुलै रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी कर्जत पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्ह्यातील तिसरा आरोपी नितीन भैलुमे याने आपल्या विरोधात कुठलाही सबळ पुरावा नसल्याने गुन्ह्यातून वगळण्यात यावे, असा अर्ज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात केला होता. मात्र, न्यायालयाने अर्ज फेटाळल्याने त्याने ऍड. एस. जी. मगरे, ऍड. एस. आर. बोदडे यांच्यामार्फत खंडपीठात जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले. मुलीच्या अंगावर चावल्याच्या खुणा होत्या. मात्र, डिपार्टमेंट ऑफ फॉरेन्सिक मेडिसीन अँड टेक्‍नॉलॉजी या संस्थेच्या अहवालानुसार आरोपीचा संबंध येत नाही. त्याच्या अंगावरील जप्त कपड्यांवर रक्ताचे डाग आढळलेले नाहीत, असा युक्तिवाद सुनावणीदरम्यान करण्यात आला. मात्र, याचिका फेटाळली जात असल्याचे लक्षात येताच आरोपींच्या वकिलांनी याचिका मागे घेतली.

Web Title: kopardi accused case in mumbai court