कोटाहून आलेले ४३ विद्यार्थी लातुरात होम क्वारंटाइन

Kota Students Returned Latur
Kota Students Returned Latur

लातूर : कोटा (राजस्थान) येथून शनिवारी (ता. दोन) रात्री उशिरा ४३ विद्यार्थी शहरात दाखल झाले. रात्री एक वाजता अंबाजोगाई रस्त्यावरील बसस्थानक क्रमांक दोनवर आरोग्य विभागाने या विद्यार्थ्यांची तपासणी केली. एकाही विद्यार्थ्याला कोरोनाची लक्षणे आढळून न आल्याने सर्वांच्या दोन्ही हातांवर होम क्वारंटाइनचा शिक्का मारून सर्वांना घरी पाठविल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.


केंद्र व राज्य सरकारने विविध ठिकाणी अडकलेल्या विद्यार्थी, कामगार, यात्रेकरू व अन्य व्यक्तींना त्यांच्या गावी जाण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यापूर्वीच कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न केले होते. त्याला यश आल्यानंतर कोटाचे विद्यार्थी आपापल्या गावाकडे रवाना होऊ लागले. जिल्ह्यातील ४३ विद्यार्थ्यांना घेऊन दोन बस शनिवारी रात्री येथे आल्या.

शनिवारी मध्यरात्रीनंतर दोन्ही बस आल्यानंतर बसस्थानक क्रमांक दोनवर आरोग्य विभागाच्या पथकाने विद्यार्थ्यांची तपासणी केली. हे पथक आधीपासूनच तैनात ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांत कोणतेही लक्षणे आढळून आले नसली तरी त्यांना होम क्वारंटाइनमध्ये चौदा दिवस राहावे लागणार आहे. पथकाने प्रत्येक विद्यार्थ्याच्या दोन्ही हातांवर होम क्वारंटाइनचा शिक्का मारल्यानंतर विद्यार्थी घराकडे रवाना झाले. अनेक दिवसांनंतर व मोठा संघर्ष करून घरी आल्यानंतर विद्यार्थ्यांना हायसे वाटले.

तीन वर्ष कसे गेले कळले नाही, जिल्हाधिकारी श्रीकांत यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ..

कुटुंबाने `अलगीकरण` केलेल्या वृद्धांची ग्रंथांशी मैत्री
कोरोनामुळे `अलगीकरण`, `विलगीकरण अलगीकरण`, `संस्थात्मक विलगीकरण` असे शब्द आता लहान मुलांच्या तोंडीही येऊ लागले आहेत. या शब्दांचा सरावही त्यांना झाला आहे. पण काही कारणामुळे कुटुंबाने `विलगीकरण (आयसोलेटेड)` केलेले, अनाथ झालेले वृद्ध येथील मातोश्री वृद्धाश्रमात आनंदी जीवन जगत आहेत. कोरोनाच्या टाळेबंदीमुळे बाहेरचे कोणी येत नाही, भीतीमुळे स्वतःला बाहेर जाता येत नाही. एकत्र येऊन केले जाणारे भजन, हरिपाठ, मंदिरातील आरतीही बंद झाली. मग या वृद्धांनी ग्रंथांशी मैत्री केली आहे. अध्यात्म अन् भक्तीशी त्यांनी नाते जुडले आहे. सकाळी आणि रात्री `रामायण`, `महाभारत` मालिका पाहण्यात हे वृद्ध मग्न होत आहेत. या सोबतच `बाबा तुम्ही कसे आहात` असा एखाद्या मुलाचा, मुलीचा फोन येईल याची वाटही काही जण पाहताना दिसून येत आहेत.


येथील पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे यांच्या नेतृत्वाखालील विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम चालवला जात आहे. या वृद्धाश्रमात तीस महिला व १९ पुरुष असे एकूण ४९ वृद्ध आहेत. शासनाचे अनुदान न घेता लातूरकरांच्या सहकाऱ्यातून व विवेकानंद रुग्णालयाच्या निधीतून हा वृद्धाश्रम चालवला जात आहे. कोरोनापासून हे वृद्ध कसे दूर राहतील याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. डॉ.महेश देवधर यांच्यावर या वृद्धांची जबाबदारी आहे. दररोज दोन तास ते त्यांच्यासाठी देतात. सगळ्यांची विचारपूस करतात, तपासणीही करतात. या वृद्धांना दिवसभर काय हवे काय नको ते पाहतात. टाळेबंदीमुळे सर्वांनाच घरात बसावे लागत आहे. दीड महिना झाले घरात बसून अनेक जण कंटाळले आहेत. मानसिक ताणतणावात आहेत. कुटुंबासोबत राहून त्यांची ही अवस्था आहे. पण कुटुंबानेच `अलगीकरण` केलेले या वृद्धाश्रमातील वृद्ध मात्र आनंदी जीवन जगत इतरासमोर आदर्श निर्माण करीत आहेत. कोरोनामुळे या वृद्धांवरही काही बंधने आली आहेत. बाहेरच्या इतर व्यक्तींना वृद्धाश्रमात प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वृद्धांनाही बाहेर जाऊ दिले जात नाही. या वृद्धाश्रमात सर्वजण एकत्रित येऊन भजन, हरिपाठ, हनुमान, राधाकृष्ण तसेच विठ्ठल रुक्ख्माई या तीन मंदिरात एकत्रित येऊन आरती करणे असे उपक्रम घेतले जात होते. पण त्यावरही काही बंधने आली आहेत. या सर्वावर या वृद्धांनी मात केली आहे. कोरोना होऊ नये म्हणून ते मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतराचा वापर करीत आपली दिनचर्या आनंदाने पार पाडत आहेत. यातील अनेक जणांनी वृत्तपत्र, पुस्तक तसेच ग्रंथाशी मैत्री केली आहे. वाचण्याचा ते आनंद घेत आहेत. अध्यात्म आणि भक्तीशी त्यांनी आपले नाते जुडले आहे. त्यातही ते आपला दिवस घावतात. सकाळी आणि रात्री `रामायण`, `महाभारत` या सारख्या मालिका पाहण्यात हे वृद्ध मग्न राहत आहेत. टाळेबंदीच्या काळात इतरांनीही या वृद्धांचा आदर्शच घेण्याची गरज आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com