लातूर येथील कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी उतरले रस्त्यावर

Latur Krushi Mahavidyalay Students
Latur Krushi Mahavidyalay Students

लातूर ः येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या विरोधात सोमवारी (ता.27) विद्यार्थी रस्त्यावर आले. प्रवेशाद्वारतच त्यांनी दिवसभर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. प्राचार्यसह प्राध्यापकांनी या विद्यार्थ्यांना विनंती करूनही ते महाविद्यालयात गेले नाहीत. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंनीच यावे अशी मागणी त्यांनी लावून धरली.


येथील कृषी महाविद्यालयात गेल्या काही दिवसांपासून प्रशासन व विद्यार्थ्यात खदखद सुरु आहे. सोमवारी हे विद्यार्थी रस्त्यावर आले. सकाळी नऊ वाजल्यापासूनच त्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या सुरु केला आहे. "प्राचार्य साहेब एक काम करो खुर्ची छोडो आराम करो', "शिक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे", "स्टुण्डंच पॉवर, नेशन पॉवर' अशा घोषणा देत या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा परिसर दणाणून सोडला आहे. प्रशासनाकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जातो, विद्यावेतन दिले जात नाही, वसतीगृहात सुविधा नाहीत, अशा अनेक मागण्या या विद्यार्थ्यांच्या आहेत. सकाळपासून या विद्यार्थ्यांनी ठिय्या सुरु केला आहे. प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे व प्राध्यापकांनी या विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम होते. कुलगुरुंनी यावे अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे.


विद्यार्थ्यांनी मागण्याचे निवेदन दिले नाही. कुलगुरुंनीच यावे अशी त्यांची मागणी आहे. वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठात हे महाविद्यालय चांगले आहे. विद्यार्थ्याना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न नेहमीच राहिला आहे. विद्यार्थ्याना समजावून सांगण्याचा प्रयत्न सुरु आहे.
डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्राचार्य, कृषी महाविद्यालय, लातूर


लोकप्रतिनिधींनी घेतला शिवभोजनाचा आस्वाद
गरीब आणि गरजू नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळीचा शहरातील लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी आस्वाद घेत या योजनेचे उद्घाटन केले. त्यानंतर ही योजना येत्या काही महिन्यांत शहराच्या चारही दिशेला सुरू केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातील कॅन्टीनमध्ये शिवभोजन थाळीचे उद्‌घाटन देशमुख यांच्या हस्ते रविवारी (ता. 26) झाले. यावेळी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार धीरज देशमुख, महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पालिका आयुक्त एम. डी. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर, विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, विभागीय वाहतूक अधिकारी अभय देशमुख उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com