'मंत्रालयातील कामांसाठी बच्चु कडू व्हावे लागते'

अनिलकुमार जमधडे
रविवार, 24 फेब्रुवारी 2019

मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची अवस्था व्हेंटीलेटरच्या रुग्णासारखी झाली आहे. राज्यपालांना गांभीर्य नाही, राज्यशासनाला देणेघेणे नाही. मंत्रालयात सामान्यांना वाली नाही, एखाद्याच बच्चु कडूंचे काम होते. म्हणूनच सामान्य माणसांमध्ये आता बच्चु कडू निर्माण झाले पाहिजेत अशी अपेक्षा माजी विभागीय आयुक्त कृष्णा भोगे यांनी केले. 

औरंगाबाद : मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची अवस्था व्हेंटीलेटरच्या रुग्णासारखी झाली आहे. राज्यपालांना गांभीर्य नाही, राज्यशासनाला देणेघेणे नाही. मंत्रालयात सामान्यांना वाली नाही, एखाद्याच बच्चु कडूंचे काम होते. म्हणूनच सामान्य माणसांमध्ये आता बच्चु कडू निर्माण झाले पाहिजेत अशी अपेक्षा माजी विभागीय आयुक्त कृष्णा भोगे यांनी केले. 

मराठवाडा वैधानिक विकास मंडळ व मराठवाडा जनता विकास परिषद यांच्या तर्फे रविवारी (ता. 24) "पाणी, माती, शेती आणि मराठवाडा विकास' या विषयावर चर्चासत्र आयोजीत केले होते. त्यावेळी कृष्णा भोगे यांनी शासकीय धोरणाचा समाचार घेतला. यावेळी वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, जनता विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे, भास्करराव मुंडे, उदय देवळाणकर, भाऊसाहेब थोरात, डी. एम. मुगळीकर, शंकर नागरे, प्राचार्य प्रताप बोराडे उपस्थित होते.

भोगे म्हणाले की, वैधानिक विकास मंडळाला 25 वर्ष पुर्ण झाले, मात्र उपयोग काही झाला नाही. डॉ. कराड यांना अध्यक्षपद दिले, पण शासकीय गाडीसाठी फिरवाफिरवी केली, हा शासनाच्या नकारात्मक मानसिकतेचा भाग आहे. वैधानिक विकास मंडळाची दुरावस्था करणे ही घटनेचा अवमान आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Krishna bhoge Speak About Bacchu kadu in Aurangabad