कृष्णा पाटील डोणगावकरही 'शिवबंधना'च्या मोहात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

औरंगाबाद : माजी खासदार व कॉंग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते साहेबराव पाटील डोणगांवकर यांचे चिरंजीव कृष्णा पाटील डोणगांवकर जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवबंधनात अडकण्याची शक्‍यता आहे. पत्नीसाठी उमेदवारी पदरात पाडून घेऊन ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस असलेल्या कृष्णा पाटील यांनी पक्षात डावलले जात असल्याचा आरोप करत कार्यकर्त्याचा मेळावा घेऊन शिवसेनेत जाण्याचा निश्‍चय केला आहे. गंगापूरचे भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत बंब यांना शह देण्यासाठी शिवसेनेने ही खेळी केली असली तरी डोणगांवकरांच्या प्रवेशाने शिवसेनेत "कही खुशी कही गम'चे वातावरण आहे. 

गंगापूर तालुक्‍यातील अंबेलोहळ गटातून जिल्हा परिषद सदस्य, लासूर स्टेशन बाजार समितीचे माजी सभापती, गंगापूर-खुल्ताबाद विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा निसटता पराभव झालेले कृष्णा पाटील डोणगावंकर राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या बातम्या अधून-मधून येत होत्या. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेसशी आघाडी करण्याचा आग्रह त्यांनी पक्षाकडे धरला होता. तत्पुर्वी झालेल्या गंगापूर सहकारी साखर कारखान्यात पॅनेल उभे करायला लावून देखील राष्ट्रवादीकडून आपल्याला सहकार्य मिळाले नाही. वरिष्ठांनीही तक्रारींकडे कानाडोळा केला, ही प्रमुख कारणे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्यामागे असल्याचे बोलले जाते. 

पत्नी देवयानी यांच्यासाठी लासूर सर्कलमधून उमेदवारी देण्याचे वचन मिळाल्यामुळेच कृष्णा पाटील यांनी शिवबंधन बांधून घेण्याची तयारी दर्शवल्याची चर्चा आहे. शिवाय जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव असल्यामुळे ही संधी देखील पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 2019 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गंगापूर-खुल्ताबाद मतदारसंघातून संभाव्य उमेदवार म्हणून देखील डोणगांवकरांना शिवसेनेतील माने विरोधी गट प्रोजेक्‍ट करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. माजी आमदार अण्णासाहेब माने यांनीच शिवसेनेचे गंगापूर-खुल्ताबाद मतदारसंघातील उमेदवार व विद्यमान जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना पाडण्याचे काम केल्याची चर्चा तालुक्‍यात आजही केली जाते. आता या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आणि अण्णासाहेब माने यांचे चिरंजीव संतोष माने यांना स्पर्धक म्हणून कृष्णा पाटील डोणगावकारांचा दानवे हेच शिवसेनेत प्रवेश करुन घेत असल्याचे समजते. कृष्णा पाटील डोणगावंकर हे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचे जावई असल्यामुळे त्यांना भाजपकडून देखील "ऑफर' देण्यात आली होती. मात्र डोणगांवकर यांनी कमळ ऐवजी शिवसेनेचे धनुष्य हाती घेण्याचा निणर्य घेतला.

Web Title: krishna patil dongaonkar to switch to shiv sena