साहित्यिकाची निरिक्षणशक्ती घारीसारखी असावी - कुमार सप्तर्षी

प्रशांत बर्दापूरकर
रविवार, 17 जून 2018

साहित्य व साहित्यिकाची निरिक्षण शक्ती घारीसारखी असली पाहिजे असे प्रतिपादन डॉ. कुमार सप्तर्षी यांनी रविवारी (ता. 17) येथे केले.

अंबाजोगाई - साहित्य व साहित्यिकाची निरिक्षण शक्ती घारीसारखी असली पाहिजे असे प्रतिपादन डॉ. कुमार सप्तर्षी यांनी रविवारी (ता. 17) येथे केले. येथील परिवर्तन साहित्य मंडळ व घाटनांदूरच्या वसुंधरा महाविद्यालयातर्फे आयोजित परिवर्तन साहित्य संमेलनात ते बोलत होते.

संमेलनाचे उद्घाटन माजी मंत्री पंडीतराव दौंड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, जिल्हा परिषद शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख स्वागताध्यक्ष गोविंदराव देशमुख, अॅड. किशोर गिरवलकर, रणजित लोमटे, जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
           
या उद्घाटन सत्रात विविध विषयावरील 18 पुस्तकांचे प्रकाशन झाले. साहित्यासह विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार झाला. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Kumara Saptarshi advised in Sahitya Sammelan