मजूर ते पोलिस उपाधिक्षक...!

dysp
dysp

मुक्रमाबाद ः कौन कहता है, की आसमान में छेंद नही होता...! एक पत्थर तो तबियत से उछालो यारो...!! हिंदीतील ही म्हण अगदी सुधाकर शिंदे या युवकाच्या कार्याला अगदी तंतोतंत लागू होते. कारण त्याने आपल्या गरिबीचे भांडवल न करता पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेत मोलमजूरी करूनही ध्येय गाठता येते. हे सुधाकर शिंदे यांनी दाखवून दिले. 

घरची परिस्थिती अतिशय बेताची. शाश्वत असे उपजिविकेचे साधन नाही. घरचे ओझे आई, वडील यांच्याच खांद्यावर लादलेले त्यांच्याच मोलमजुरीवर घरचा चरितार्थ भागत असे. त्यात घरात खाणारी अनेक व्यक्ती, त्यात बहिणीचे लग्न, शिक्षण होते. संसार कसेबसे चालत असे. त्यामुळे आपल्या शिक्षणाच्या खर्चाचे ओझे आपल्या आई, वडिलांवर पडू नये यासाठी आपल्या गरिबीचे भांडवल न करता लागेल ती मजूरीची कामे करून मुखेड तालुक्यातील बामणी येथील सुधाकर राजेंद्र शिंदे हा पोलिस उपाधिक्षक होऊन आजच्या युवकांसमोर एक आदर्श रोल मॉडेल बनला आहे.

उर्मी काही केल्या शांत बसू देत नव्हती
गाव लहान असल्यामुळे उच्च शिक्षणाची सोय नसल्यामुळे गावातीलच जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण हे मुक्रमाबाद येथील भाऊसाहेब देशमुख उच्च माध्यमिक विद्यालयात १९९६ या वर्षात पुर्ण केले. पुढील शिक्षण घेण्यासाठी घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे शिक्षणासाठी वडिलांकडे पैसे मागणेही योग्य नाही. पण पोलिस अधिकारी होण्याची उरात दाटलेली उर्मी काही केल्या बसू देत नव्हती.

मजुरी करून अभ्यास केला पुर्ण
पोलिस अधिकारी व्होयाचे आणि आपले घरची परिस्थिती सुधरावी यासाठी पेटून उठला अन् शेतातील कामावर शेतमजूर म्हणून तर तेरू नदीवर ट्रॅक्टरवर वाळू चाळण्यासाठी दिवस-रात्र लेबर म्हणून कामाला जाऊ लागला. आणि त्या मिळालेल्या मजुरीच्या पैश्यातून घर खर्चासाठी देऊन शिल्लक राहिलेल्या पैश्यातून स्पर्धा परीक्षेची पुस्तकी आणून तयारीला लागला. रात्र-पाळी मजुरी करून मिळालेल्या वेळेत अभ्यास करत असे. २००२ साली पहिल्याच स्पर्धा परीक्षेत नेत्रदिपक असे यश मिळवत पास झाला आणि आपल्या अंगावर खाकी वर्दी घालण्याचे व देश सेवा करण्याचे असलेले त्याचे स्वप्न सत्यात उतरले. आॅगस्ट २००४ मध्ये हिमाचल प्रदेश शिमला येथे पोलिस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. तो दिवस म्हणजे त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुबियांसाठी दिवाळीचा ठरला. पोलिस दलात अधिकारी होण्याची त्याची जिद्द कायम होती. त्यानुसार तो कार्य करत राहिला. नोव्हेंबर २००८ मध्ये चंदीगड येथे पोलिस उपनिरिक्षक म्हणून पदोन्नती झाली.

विविध राज्यात बजावली सेवा
२००४ ते २०१३ या दरम्यान हिमाचल प्रदेश, जम्मू कश्मिर, हरियाणा, पंजाब, दिल्ली व छत्तीसगढ, येथे आंतरराष्ट्रीय सिमा सुरक्षा अंतर्गत देश, विदेशातील सुरक्षेची जबाबदारी मोठ्या कुशलतेने पार पाडली. शिंदे यांच्या अंगी असलेली कुशल व कार्य करण्याची असलेली तत्परता असल्याने भारत सरकारकडून दखल त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना २०१३ ते २०१९ या दरम्यान राष्ट्रीय आपदा प्राधिकरणमध्ये पथकप्रमुख म्हणून नेमणूक केली. या वेळी राष्ट्रपती, पंतप्रधान, राष्ट्रपती भवन, स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन यासह रासायनिक, जैविक, दहशतवादी हल्ला पथकात मोलाचे अन्यय असे योगदान देऊन देश कार्यात मोठे योगदान दिले. डिसेंबर २०१९ मध्ये भारत सरकारने सुधाकर राजेंद्र शिंदे यांची छत्तीसगढ येथील नारायणपुर येथे पोलिस उपाधिक्षक म्हणून बढती देण्यात आली.

अचूक ध्येय ठेवून अभ्यास करणे गरजेचे
विद्यार्थ्यांनी आपल्या घरची परिस्थिती कायम लक्षात ठेऊन व अचूक ध्येय डोळ्यासमोर ठेऊन अभ्यास केला. तर आपण उराशी बाळगलेल्या ध्येयाला नक्कीच गवसणी घालतो. पण त्यासाठी जिद्द व चिकाटी परिश्रम अंगात असणे गरजेचे आहे.
- सुधाकर शिंदे, पोलिस उपाधिक्षक, छत्तीसगढ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com