मोसंबीतोड कामगारांचा टेंपो पलटी, दहा मजूर जखमी

मोसंबीतोड कामगारांचा टेंपो पलटी, दहा मजूर जखमी

आडूळ (जि.औरंगाबाद) ः आडूळहून पैठण येथील मोसंबी बागेतील मोसंबी तोडण्यासाठी मजूर घेऊन जात असलेला टेंपोचा स्टेरिंग लॉक झाल्याने टेंपो पलटी होऊन दहा मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता.एक) सकाळी आठच्या सुमारास आडूळ (ता.पैठण) शिवारातील शिवगड तांड्याजवळ घडली.


अपघातानंतर जखमी मजुरांना आडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह एक ही कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे जखमींना तब्बल अर्धातास प्रतीक्षा केल्यानंतरही कोणीही आले नसल्याने अखेर त्यांना खासगी वाहनातून उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले. टेंपोने (एमएच-20, बीटी-4598) इकबाल अकबर शेख (वय 32), अन्वर अकबर शेख (28), अशपाक युसूफ शेख (29), अमजद जब्बार शेख (25), एजाज वजीर पठाण (मारिया) (25), सरवर तैंबूर शेख (वय 26, सर्व रा. आडूळ बु., ता.पैठण), सुरेखा रणजित राठोड (20), स्वार्थी राजू राठोड (20), पायल कल्याण राठोड (18), राम संजय राठोड (वय 18, सर्व रा.अब्दुल्लापूर तांडा, ता. पैठण) हे मोसंबीतोड कामगार आडूळहून पैठण येथील एका मोसंबी बागेतील मोसंबी तोडण्यासाठी जात असताना शिवगडनजीक त्यांना घेऊन जात असलेल्या टेंपोचा स्टेरिंग लॉक झाल्याने टेंपो पलटी झाला. यात हे वरील सर्वजण जखमी झाले, इतर काहीजण बालंबाल बचावले. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून, तपास ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार कल्याण राठोड, फेरोज बरडे करीत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com