लच्छू पहिलवानला सोमवारपर्यंत कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

औरंगाबाद - दंगल, जाळपोळीच्या प्रकरणात लक्ष्मीनारायण ऊर्फ लच्छू बाबूलाल बाखरिया (रा. धावणी मोहल्ला) याला गुरुवारी (ता. 17) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एस. खांडबहाळे यांच्यासमोर हजर करण्यात आले असता सोमवारपर्यंत (ता. 21) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

औरंगाबाद - दंगल, जाळपोळीच्या प्रकरणात लक्ष्मीनारायण ऊर्फ लच्छू बाबूलाल बाखरिया (रा. धावणी मोहल्ला) याला गुरुवारी (ता. 17) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एस. खांडबहाळे यांच्यासमोर हजर करण्यात आले असता सोमवारपर्यंत (ता. 21) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

आर्थिक गुन्हे शाखेचे लक्ष्मण वाघ यांनी सरकार पक्षातर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार मोतीकारंजा परिसरात पेट्रोलिंग करत असताना एका दुकानास आग लागली होती. या ठिकाणी पंधरा ते वीस लोक आग लावून पळून गेले. त्यांचा पाठलाग करून पकडण्यात आले. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. यामध्ये सुरेश नलवडे नामक व्यक्तीच्या हातात धारदार कुकरी सापडली. सदर गुन्ह्यातील दहा व्यक्तींना पूर्वीच अटक करण्यात आली. त्यांना पोलिस कोठडीनंतर आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. यातील एक संशयित आरोपी लच्छू पहिलवान यास बुधवारी रात्री उशिरा अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी (ता. 17) न्यायालयात हजर करण्यात आले. 

लच्छूंनी वादाला तोंड फोडले 
लच्छू पहिलवानने जाळपोळ व दंगल घडवून आणण्यासाठी चिथावणी देत दोन गटांतील वादाला तोंड फोडले होते. दोन्ही गटांत झालेल्या किरकोळ भांडणाचे रूपांतर मोठ्या जातीय दंगलीत होऊन मोठ्या प्रमाणावर मालमत्तेची व जीवितहानी झाली आहे. पूर्ववैमनस्याने पुन्हा हिंसक कारवाई रोखण्यासाठी लच्छू हा गुन्ह्यातील पुराव्यांत फेरबदल करू शकतो. पीडितांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी केला. 

Web Title: lacchu pahilwan police custody till monday