लच्छू पहेलवान यांच्या अटकेच्या निषेधार्थ राजबाजार, गुलमंडी बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

मोहल्ला, गुलमंडी, राजबाजार आदी भागात लच्छू पहेलवान यांच्या अटकेच्या निषेधार्थ बंद पाळण्यात आला आहे. दुपारी अडीच पर्यंत दुकाने बंदच होती. व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला असून त्यांची याबाबत एक बैठकही दुपारी सुरु झाली.

औरंगाबाद : दंगल आणि जाळपोळ केल्याच्या आरोपाखाली शिवसेना कार्यकर्ता लक्ष्मीनारायण बाखरिया ऊर्फ लच्छू पहिलवान (वय 47, धावणी मोहल्ला) याना पोलिसांच्या विशेष तपास पथकाने बुधवारी (ता. 16) रात्री साडेनऊ वाजता अटक केली.

त्यानंतर गुरुवारी (ता. 17) धावणी मोहल्ला, गुलमंडी, राजबाजार आदी भागात लच्छू पहेलवान यांच्या अटकेच्या निषेधार्थ बंद पाळण्यात आला आहे. दुपारी अडीच पर्यंत दुकाने बंदच होती. व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला असून त्यांची याबाबत एक बैठकही दुपारी सुरु झाली.

त्या धर्तीवर पोलिसांचा या भागात कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

Web Title: lachu pehelwan arrested in Aurangabad riot case

टॅग्स