औरंगाबाद जिल्ह्यात सात लाख जनावरांचा प्रश्‍न गंभीर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

औरंगाबाद : जिल्ह्यात भीषण दुष्काळामुळे पिण्यासह जनावरांच्या प्रश्‍नही गंभीर बनला आहे. कमी पावसाने खरीप, रब्बी हंगामातील पिके करपून गेली. त्यामुळे सहा लाख 76 हजारांपेक्षा अधिक जनावरांसाठी जुलैपर्यंत दोन लाख 66 हजार मेट्रिक टन चाऱ्याची तूट आहे. 

औरंगाबाद : जिल्ह्यात भीषण दुष्काळामुळे पिण्यासह जनावरांच्या प्रश्‍नही गंभीर बनला आहे. कमी पावसाने खरीप, रब्बी हंगामातील पिके करपून गेली. त्यामुळे सहा लाख 76 हजारांपेक्षा अधिक जनावरांसाठी जुलैपर्यंत दोन लाख 66 हजार मेट्रिक टन चाऱ्याची तूट आहे. 

मराठवाडा तीन-चार वर्षांपासून सातत्याने दुष्काळाचा सामना करीत आहे. त्यामुळे शेतीसाठी मुबलक पाणीसाठा ऑक्‍टोबर, नोव्हेंबरपर्यंतच उपलब्ध असतो. त्यानंतरचे सात-आठ महिने मोठ्या कष्टाचे असतात. शेतीसाठी पुरेसे पाणी नसल्याने पिकांची गुणवत्ताही खालावली आहे. त्यामुळे जनावरांसाठी चाऱ्यातही तूट निर्माण झाली आहे. यंदा दुष्काळामुळे पीकपेरा झालाच नाही. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर स्वरूप धारण करीत आहे. अशा परिस्थितीत जनावरे कशी जगवायची, असा बिकट प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. जिल्ह्यात एकूण सहा लाख 76 हजार 180 जनावरे आहेत. पाच लाख 8 हजार 62 मोठी व एक लाख 68 हजार 118 लहान जनावरे आहेत. मोठ्या जनावरांना तीन हजार 47 मेट्रिक टन व लहान जनावरांना 504 मेट्रिक टन चारा रोज पाहिजे. जिल्ह्यात 1 नोव्हेंबर 2018 पर्यंत 5 लाख 34 हजार 684 मेट्रिक टन चारा उपलब्ध होता. आता चाराच उपलब्ध नसल्याने प्रश्‍न गंभीर झाला आहे. 

जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार जुलैपर्यंत जनावरांना किमान 2 लाख 66 हजार 475 मेट्रिक टन चारा पाहिजे. चाऱ्याची तूट भरून काढण्यासाठी चारा छावणीशिवाय पर्याय नाही. 

तालुका जनावरे रोज लागणारा चारा 
तालुका-----------------------लागणार चारा मेट्रिक टनांमध्ये 
औरंगाबाद-----------------------8,83,93,467 
फुलंब्री-----------------------7,12,45,365 
पैठण-----------------------8,92,60,469 
गंगापूर-----------------------7,19,97,385 
वैजापूर-----------------------7,91,63,423 
कन्नड-----------------------11,97,00,627 
खुलताबाद-----------------------3,90,02199 
सिल्लोड-----------------------8,02,00,422 
सोयगाव-----------------------3,72,20,196 
--------------------------------------------------- 
एकूण 6,76,18,03,553 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lack of food for cattle in Aurangabad