खरेदी केंद्रासाठी परंड्यात सक्षम संस्थेचा अभाव

खरेदी केंद्रासाठी परंड्यात सक्षम संस्थेचा अभाव

परंडा : दुष्काळ उंबरठ्यावर आलेला असताना शेतकऱ्यांसाठी शासनाचे हमी भाव केंद्र आधार वाटत आहे. मात्र हमी भाव केंद्रासाठी शासनाच्या नियम अटीची पूर्तता करणारी सक्षम संस्था सध्या तरी नसल्याने परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांवर हमी भावाने नव्हे तर मिळेल त्या भावाने शेतमाल विकण्याची वेळ येणार आहे. 

पावसाने दगा दिल्याने खरीप पिके अडचणीत आली. खरीप पिकांचा उत्पादन खर्चही पदरात पडेल की नाही, याची खात्री शेतकऱ्यांना नाही. तर हातात येणाऱ्या पिकांना हमीभाव मिळेल, या एकमेव आशेवर शेतकरी आहे. शासनाच्या वतीने ठिकठिकाणी हमी भाव खरेदी केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. केंद्र सुरु करण्यासाठी शासनाला सक्षम संस्थेची आवश्यकता आहे. खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी अ किंवा ब वर्ग सभासद संस्था आवश्यक आहे. संस्थेकडे साधनसामुग्री व मनुष्यबळ असल्याचे सहायक निबंधक सहकारी संस्था यांचे पत्र आवश्यक आहे. खरेदी- विक्रीचा एक वर्षाचा अनुभव, इन्कमटॅक्स रिर्टन, लेखा परीक्षण, 10 लाखांचे खेळते भाडवंल, आधारभूत किंमत खरेदी योजनेसाठी नाफेडने निश्चित केलेले स्टॅण्डर्ड ऑपरेटींग प्रोसिजन मान्य असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र, जिल्हा पणन अधिकारी यांचे ना हरकत प्रमाणपत्र, 10 लाख रुपये अनामत यासह विविध बाबींची पूर्तता करणाऱ्या संस्थेला शासन हमी भाव केंद्र सुरू करण्यासाठी मान्यता देणार आहे.

या अटींची पूर्तता करणारी परंडा तालुक्यात एकही सक्षम संस्थाच नसल्याने तालुक्यात हमी भाव केंद्र सुरू होण्याची शक्यता सध्या तरी नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळेल त्या भावाने उडीद, मूग, सोयाबीनची विक्री करावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com