Breaking news : बीड जिल्ह्यातील लाडेवडगाव शिवारात तरुणाचा मृतदेह आढळला; अनैतिक संबंधातून खून झाल्याचा संशय 

रामदास साबळे 
Saturday, 18 July 2020

तालुक्यातील लाडेवडगाव येथील चाळीस वर्षीय पुरूषाचा विवस्त्र अवस्थेत असलेला मृतदेह शनिवार (ता.१८) रोजी सकाळी आढळून आला. ही घटना आडस-अंबाजोगाई रस्त्याच्या जवळ लाडेवडगाव शिवारात घडली. या मृतदेहाची ओळख पटली असून तो लाडेवडगाव येथील बाबासाहेब चंद्रसेन लाड (वय-४०) यांचा असल्याचे समजते. ही घटना अनैतिक संबंधातून घडली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

केज (बीड) : तालुक्यातील लाडेवडगाव येथील चाळीस वर्षीय पुरूषाचा विवस्त्र अवस्थेत असलेला मृतदेह शनिवार (ता.१८) रोजी सकाळी आढळून आला. ही घटना आडस-अंबाजोगाई रस्त्याच्या जवळ लाडेवडगाव शिवारात घडली. या मृतदेहाची ओळख पटली असून तो लाडेवडगाव येथील बाबासाहेब चंद्रसेन लाड (वय-४०) यांचा असल्याचे समजते. ही घटना अनैतिक संबंधातून घडली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

तालुक्यातील लाडेवडगाव येथील बाबासाहेब लाड याचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आडस-अंबाजोगाई रस्त्याच्या थोड्याशा अंतरावर असलेल्या शेतात शनिवारी सकाळी आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहावर लोखंडी गजाने मारहाण झाल्याचे वळ उमटले असल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचे दिसून‌ आले. त्यामुळे हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली असल्याची शक्यता आहे. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

घटनेची माहिती मिळताच युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उच्चस्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पाठविला आहे.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

अतिरिक्त पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी मयताची दुचाकी घटना झालेल्या परिसरात आढळून आली आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून गुन्हा दाखल होताच युसूफ वडगाव पोलीस पुढील तपास करणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे यांनी सांगितले.

(संपादन : प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ladevadgaon Shivar youth body found Assumption of murder