‘लेडीज टॉयलेट’मुळे होणार कुचंबणा दूर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - शहराच्या मध्यवस्तीत महिलांसाठी पाच स्वच्छतागृहे उभारण्याच्या निविदा महापालिकेने काढल्या आहेत. यामुळे बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्या महिलांची सोय या माध्यमातून होणार आहे. 

औरंगाबाद - शहराच्या मध्यवस्तीत महिलांसाठी पाच स्वच्छतागृहे उभारण्याच्या निविदा महापालिकेने काढल्या आहेत. यामुळे बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्या महिलांची सोय या माध्यमातून होणार आहे. 

शहरात अगोदरच कमी असलेल्या स्वच्छतागृहांमध्ये महिलांसाठी उपयुक्त अशी स्वच्छतागृहे कमीच आहेत. महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्यासाठी महापालिकेने आता शहरातील पाच ठिकाणांची निवड करत ती उभारण्यासाठी ५६ लाखांची निविदा प्रसिद्ध केली आहे. पैठणगेट, औरंगपुरा बस थांबा, सिडको एन-आठ बोटॅनिकल गार्डन, बिबी का मकबरा (जागा अनिश्‍चित) आणि ज्युब्ली पार्क येथील शाळेलागतच्या जागेत ही उभारणी करण्याचे महापालिकेने महिलांसाठी ‘पे अँड यूज’ तत्त्वावर टॉयलेट उभारण्याचे ठरवले आहे. 

मकबऱ्यालगतचे स्वच्छतागृह कधी उघडणार?
बिबी का मकबरा परिसरात पर्यटकांसाठी महापालिकेने उभारलेले एक स्वच्छतागृह दुरवस्थेत आहे. असे असताना यालगतच्या जागेत महापालिकेने स्वच्छतागृहाच्या भूमिपूजनाचा सोपस्कार केला होता. दुरुस्त करण्यात आले असले तरी हे स्वच्छतागृह कुलूपबंद आहे. ते उघडल्यास नव्या स्वच्छतागृहाची आवश्‍यकताच उरणार नाही; पण ते उघडणार कधी, हा प्रश्‍नच आहे.

Web Title: Ladies Toilet issue may be slove