धक्कादायक! पेट्रोल टाकून तरुणीला जाळले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात एका 18 वर्षाच्या तरुणीवर पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. 

​नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात एका 18 वर्षाच्या तरुणीवर पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. 

देगलूर तालुक्यातील तडखेल जवळ ही घटना काल उघडकीस आली. या तरुणीची अद्याप ओळख पटली नाही. एका पाईपमध्ये तरुणीचा म्रतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. 

पोलिस खून प्रकरणात काही पुरावे सापडतात का याचा शोध घेताहेत. म्रतदेहाच्या उत्तरीय तपासणी करण्यात आली असून, या तरुणीचा खून करुन जाळण्यात आला का? किंवा तिला जिवंत जाळण्यात आले याचा शोध पोलिस घेत असून, संबधीत तरुणीचा चेहरा पूर्ण जळाला आहे. त्यामुळे ओळख पटविण्यासाठी अडचणी जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, अत्यंत निर्घृणपणे तरुणीचा खुन करण्यात आला आहे. या प्रकरणी देगलूर पोलिसांत अज्ञात आरोपीं विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a lady burned by unknown in Nanded