महिला सरपंच लाचेच्या जाळ्यात 

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 11 मार्च 2019

नांदेड :  शौचालयाचा धनादेश देण्यासाठी सोळाशे रुपयाची लाच घेणाऱ्या महिला सरपंचासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानी रंगेहात पकडले. हा सापळा बावलगाव (ता. मुखेड) ग्रामंपचायत येते सोमवारी (ता. 11) दुपारी साडेबारा वाजता लावण्यात आला होता.

नांदेड :  शौचालयाचा धनादेश देण्यासाठी सोळाशे रुपयाची लाच घेणाऱ्या महिला सरपंचासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानी रंगेहात पकडले. हा सापळा बावलगाव (ता. मुखेड) ग्रामंपचायत येते सोमवारी (ता. 11) दुपारी साडेबारा वाजता लावण्यात आला होता.

मुखेड तालुक्यातील बावलगाव ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाचे कामे करण्यात आली होती. त्यात तक्रादाराला दोन शौचालय आले होते. त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रती शौचालयाची 12 हजार रुपये रक्कम येणे बाकी होती. त्यासाठी तक्रारदार हा ग्रामपंचायत कार्यालयात गेला. सरपंच लक्ष्मीबाई जयवंत माने (वय 50) यांनी दोन्ही धनादेश देण्यासाठी एक हजार 600 रुपयाची लाच मागीतली. परंतु ही लाच देणयाची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने नांदेड येथे येऊन संबंधीत सरपंच व त्यांचा खाजगी व्यक्ती देविदास कोंडीबा साखरे यांच्या विरूध्द तक्रार दिली.

या प्रकरणात सात मार्चला पडताळणी सापळा लावण्यात आला. यात लाच मागीत्ल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबीच्या पथकाने सोमवारी (ता. 11) ग्रामपंचायत कार्यालय परिसरात सापळा लावला. दुपारी साडेबारा वाजता सरपंच महिलेनी आपल्या खाजगी व्यक्तीच्या हस्ते सोळाशे रुपये स्विकारले. यानंतर या दोघांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरूध्द मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सापळा यशस्वी करण्यासाठी पोलिस उपाधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कपील शेळके यांच्या पथकांनी परिश्रम घेतले.  

Web Title: lady sarpanch caught while taking bribe