तिने चोरली चक्क पोलिस निरीक्षकाची साखळी; अन्...

lady stoles police inspector chain at Aurangabad
lady stoles police inspector chain at Aurangabad

औरंगाबाद : पोलिस निरीक्षकांच्या घरी ती साफसफाईची कामे करते. तिच्यावरही कुटुंबीयांचा विश्वास. पण बेडरूममध्ये पलंगावर पडलेल्या दोन तोळ्यांच्या साखळीवर  नजर पडली अन्.. तिची नियत खराब झाली. साखळी तर लांबवली, पण चोरी उघडही झाली. तरीही निरीक्षकाने खाक्या न दाखवता तिचा यथोचित सत्कार करून तिला दिवाळी फराळ अन.. दोनशे रुपये देऊन घरी पाठविले.

सोमवारी (ता. 28) ला औरंगाबादच्या सातारा परिसरात हा प्रकार घडला.  
पूर्वी औरंगाबादेत हर्सूल ठाण्याचे आणि आता पुणे येथे रुजू असलेल्या एक पोलीस निरीक्षक सातारा परिसरात राहतात. दिवाळीच्या निमित्ताने ते  पुण्यातुन सुट्टीत घरी आले. सोमवारी सकाळी त्यांच्या घरातून मुलाची दोन तोळ्यांची सोन्याची चैन गहाळ झाली. घरात सर्व ठिकाणी शोध घेऊनही चैन सापडत नव्हती. घरात फक्त मोलकरीणच आली व तीही फरशी पुसत होती . पण ती विश्वासु असल्याने तिला कसे विचारणार हा प्रश्न होता.  म्हणून त्या निरीक्षकाने शेवटी सातारा पोलीस ठाण्यात कॉल केला. दिवाळीच्या दिवसात कर्मचारी सुट्ट्या वर असतात. तरीही तितक्याच तत्परतेने  कॉल महिला उपनिरीक्षक अनिता फसाटे, सहायक फौजदार सानप, हवालदार ससाणे, कैसार पटेल आणि चालक देडवाल तात्काळ निरीक्षकाच्या घरी पोचले. त्यांनी शोधाशोध केली. मोलकरणीची चौकशी केली पण तिने आपण चैन घेतली नसल्याचे स्पष्ट व ठणकावून  सांगितले. त्यामुळे पोलिसांचा नाईलाज झाला. 

अशी उकलली चोरी.. 
मोलकरीण काम आटोपून निघून जाण्याच्या तयारीत असताना सातारा पोलिस चलाखीने तिच्यावर लक्ष ठेवून होते. पोलिसांनी तिला झडतीसाठी बोलाविले, तेव्हा तिने चेन झाडात फेकली. पण कैसर पटेल या हेडकॉन्स्टेबलने ते हेरले. मग कुठे तिने चोरी केल्याचे कबुल केले. 

अशी झाली चोरी.. 
मोलकरीण बेडरूममध्ये फरशी पुसताना पोलिस निरीक्षकाचा मुलगा कामात व्यग्र होता. त्याची चैन बेडवर होती. खोलीत कुणी नसल्याने ती चैन पाहताच मोकारणीच्या मनात लालसा झाली आणि तिने चेन लांबविली.

भाऊबीजीची दिली ओवाळणी 
"त्या बाईची काहीतरी गरज असेल म्हणून तिने असे केले असावे.  तिची दिवाळी सुखात जावी म्हणून भाऊबीजीची ओवाळणी आणि फराळ देऊन तिला घरी पाठविले. आमचीही चैन मिळाली. आमची दिवाळी चांगली झाली. केवळ सातारा पोलिसांच्या तात्काळ रिस्पॉन्समुळे व कौशल्यपूर्ण चौकशी मुळे आमचा दागिना मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com