विजपुरवठा खंडीत झाल्याने लाईनमनला मारहाण    

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नांदेड - नांदेड तालुक्यातील वडगांव येथे लाईन दुरुस्तीसाठी गेलेल्या महावितरणच्या राजेश्वर चातरवार यांना मारहाण केली असल्याचे समोर आले. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात सरपंच नामदेव पुयड, उपसरपंच एकनाथ पुयड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

विजपुरवठा खंडीत झाल्यामुळे नामदेव पुयड आणि एकनाथ पुयड यांना राग आला. त्यानंतर ''तुम्ही काय झोपा काढतायत का?''  असे म्हणत त्यांनी लाईनमनशी वाद घातला. त्यानंतर त्याला मारहाण केली.

गावच्या प्रमुखाकडून असे प्रकार घडत असतील तर कर्मचाऱ्यानी काय करायचे असा प्रश्न त्यामुळे उपस्थित केला जात असून, कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

Web Title: Laineman beat up due to discontinuance of electricity