जिल्हा परिषदेसाठी आज उडणार उमेदवारांची झुंबड 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात प्रमुख पक्षांचा काथ्याकुट सुरू असताना दुसरीकडे इतर पक्ष आणि अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात केली आहे. मंगळवारी (ता.31) तहसील कार्यालय उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होत आहे. आत्तापर्यंत जिल्हा परिषदेसाठी 95 तर नऊ पंचायत समित्यांच्या 124 गणांसाठी 145 अर्ज प्राप्त झाले आहे. बुधवार (ता.1) नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची झुंबड उडण्याची शक्‍यता आहे. 

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयांमध्ये गर्दी झाली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करताना अर्जासोबत विविध शपथपत्रे, शौचालय वापरत असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागले आहे. चार दिवसांत बोटावर मोजणे इतकेच अर्ज दाखल झाले होते. पाचव्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार त्यांचे समर्थकांनी गर्दी केली होती. जिल्हा परिषदेच्या 62 गटांसाठी 95 तर पंचायत समिती 124 गणांसाठी 145 नामनिर्देशन पत्र दाखल झाले. 
औरंगाबाद तालुक्‍यात गटासाठी 5, गणातून 4, फुलंब्रीमध्ये गटात 1 तर गणातून 2 अर्ज, सिल्लोडमध्ये गटासाठी 12 तर गणासाठी 10 अर्ज, सोयगावमध्ये गटासाठी 6 तर गणासाठी 13, कन्नडमध्ये गटासाठी 22 तर गटासाठी 30, खुलताबादमध्ये गटासाठी 8 तर गणासाठी 10, गंगापूरमध्ये गटासाठी 4 तर गणासाठी 11 अर्ज, पैठणमध्ये गटासाठी 31 तर गणासाठी 52, वैजापूरमध्ये गटासाठी 6 गणासाठी 14 अर्ज दाखल झाले आहेत. 

बुधवार (ता.1) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने तहसील कार्यालयात झुंबड उडण्याची शक्‍यता आहे. प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत तसेच उमेदवारांकडून सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत रांगेत अर्ज स्वीकारले जाणार आहे.

Web Title: The last day for filing nominations