बीडला शेवटची झेडपी सभा शांत; पण स्नेहभोजनाकडे विरोधकांची पाठ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

बीड जिल्हा परिषदेची शेवटची सर्वसाधारण सभा सोमवारी झाली. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षांनी ठेवलेल्या स्नेहभाेजनाकडे विराेधी सदस्यांनी पाठ फिरविली. या वेळी महिला पदाधिकाऱ्यांशी उद्धट बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले.

बीड - जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपूनही दुष्काळामुळे मुदतवाढ भेटलेल्या विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील शेवटची जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी (ता. दोन) शांततेत झाली; परंतु अध्यक्षांनी आपल्या शासकीय निवासस्थानी ठेवलेल्या स्नेहभोजनाकडे विरोधी सदस्यांनी पाठ फिरविली. 

दरम्यान, महिला पदाधिकाऱ्यांशी उद्धट बोलणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांविरोधात राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत कारवाईचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिले.

हेही वाचा - तरुणीचा अतिप्रसंगानेच मृत्यू, आरोपीस पोलिस कोठडी

अध्यक्षा सविता गोल्हार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेला उपाध्यक्षा जयश्री मस्के, सभापती राजेसाहेब देशमुख, संतोष हंगे, अजित कुंभार यांच्यासह अधिकारी, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या "टर्म'मधील ही शेवटची सर्वसाधारण सभा समजली जात असल्याने उपस्थित सदस्यांनी जास्तीच्या संख्येने हजेरी लावली; परंतु या सभेत आरोप-प्रत्यारोप आणि कामांबाबत तक्रारी झाल्या नाहीत. पाणीपुरवठा योजनांचे कार्यारंभ आदेश नियमांना डावलून दिल्याचा आरोप सत्ताधारी सदस्यांनीच केला.

हेही वाचा - 84 शेतकऱ्यांनी मिळून घेतले एवढे कर्ज

हंगामी वसतिगृह सुरू करण्याची मागणीही या बैठकीत प्रकाश कवठेकर यांनी केली. महिला पदाधिकाऱ्यांसोबत उद्धट वागणुकीचा मुद्दा राष्ट्रवादीचे जयसिंह सोळंके यांनी उपस्थित केला. हंगामी वसतिगृह सुरू करण्याची घोषणा सभापती राजेसाहेब देशमुख यांनी केली. 

सत्ताधारी 25 सदस्यांची हजेरी 
अध्यक्षपदाची टर्म संपत असल्याने अध्यक्षांनी सदस्यांसाठी स्नेहभोजन ठेवले; परंतु याकडे विरोधी सदस्यांनी पाठ फिरविली. साधारण सत्ताधारी 25 सदस्यांनी हजेरी लावली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Last General Meeting of Beed Zilla Parishad

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: