‘अमर रहे’च्या घोषात हुतात्मा तौसिफ शेख यांना अखेरचा निरोप 

tosif
tosif

पाटोदा : गडचिरोली जिल्ह्यातील जांबुरखेडा गावातील नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भुसुरुंग स्फोटात शहीद जवान शेख तौसीफ आरिफ यांना ‘शहीद जवान तौसिफ शेख अमर रहे’ घोषणा देत शासकीय इतमातात अखेरचा निरोप देण्यात आला.

शहरातील क्रांतीनगर भागातील शेख तौसिफ आरिफ हे 2010 साली गडचिरोली पोलिसमध्ये शिपाई पदावर भरती झाले होते. 26 एप्रिल 2011 मध्ये त्यांची गडचिरोली जिल्ह्यात नियुक्ती झाली. त्यांनी आपल्या कार्यकाळात मोठा पराक्रम गाजवला होता. सहा वेळा नक्षलवाद्यांशी झुंज देत तीन वर्षात पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. तौसीफ यांना पोलिस महासंचालक पदकाने गौरविण्यात आले होते. त्यानंतर पाटोदा शहरात त्यांचा मोठा सत्कार देखील करण्यात आला होता.

मात्र, बुधवारी (ता. 1) जांबुरखेडा गावात नलक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात ते हुतात्मा  झाले. गुरुवार - शुक्रवारच्या मध्यरात्री त्यांचे पार्थिव पाटोदात पोहचले. शुक्रवारी (ता. 3) सकाळी नऊ वाजता सजविलेल्या वाहनात त्यांचे पार्थिव मांडून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. हजारोंच्या संख्येने सहभागी नागरिकांनी ‘शहीद जवान तौसीफ शेख अमर रहे, नक्षलवाद मुरदाबाद’ अशा घोषणा दिल्या. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.   दरम्यान,  अंत्यसंस्कार (दफनविधी) प्रसंगी मुस्लीम बांधवांनी नमाज एं जनाजा अदा केली तर पोलिसांनी बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. यावेळी मौलाना मुईम, हाफिज जाकेर, आमदार सुरेश धस, भिमराव धोंडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, माजी आमदार साहेराव दरेकर, सुनिल धांडे, सिराज देशमुख, सय्यद सलिम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, सय्यद अब्दुल्ला, संदिप क्षीरसागर, शिवसेनेचे कुंडलिक खांडे,भाजपचे रमेश पोकळे, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार रूपा चित्रक, पोलीस निरीक्षक सिदार्थ माने , ले.कर्नल कल्याण डोरले,कॅप्टन माळी, जुबेर चाऊस, नगरध्यक्षा अनिता नारायणकर,  बाळासाहेब आजबे, सतिष शिंदे, राजेंद्र मस्के, रामकृष्ण बांगर,सतिष महाराज उरणकर, रामकृष्ण रंधवे, महेंद्र गर्जे, अप्पासाहेब राख, सोमिनाथ कोल्हे, बळीराम पोटे, सुधीर घुमरे ,मधुकर गर्जे  यांच्या सह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले.

या वेळी उपस्थीत हजारो नागरिकांनी शहीद जवान तोसीफ भाई अमर राहे च्या घोषणा देत आपल्या लाडक्या सुपुत्राला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. तौसिफ शेख यांच्या घरी आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com