esakal | दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर दृष्टीहीन लताने सर केलं कळसुबाई शिखर
sakal

बोलून बातमी शोधा

Lata Panchal from Deulgaon has climbed the Kalsubai peak 2.jpg

यावर्षी प्रतिष्ठानच्या वतीने राज्यातील २० जिल्ह्यांतील ७० दिव्यांग युवांना ३० डिसेंबरच्या मध्यरात्री सह्याद्री पायथ्याशी असलेल्या जाहिंगीरदारवाडी गावात एकत्र आणण्यात आले. दुसर्‍या दिवशी सकाळी मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेत लता पांचाळ आपल्या काही मैंत्रिणींच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झाली होती.

दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर दृष्टीहीन लताने सर केलं कळसुबाई शिखर

sakal_logo
By
जगदीश जोगदंड

पूर्णा (परभणी) : अंधत्वावर मात करत तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथील उध्दवराव व अरुणाबाई यांची मुलगी लता ही युवती दोन्ही डोळ्यांनी आंधळी आहे. अंधत्वावर मात करत लताने महाराष्ट्रातील सर्वात उंच व चढाईला अतिशय कठीण मानल्या जाणाऱ्या व समुद्रसपाटीपासून पाच हजार चारशे फूट उंच असलेले कळसूबाई शिखर सर करत आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रदर्शन घडविले. नववर्षाच्या पुर्वसंध्येला तिने ही मोहिम फत्ते केली. शिवार्जुन प्रतिष्ठानकडून दरवर्षी दिव्यांग युवक-युवतींना कळसूबाई शिखर सर करण्याची मोहिम आखून प्रोत्साहित केले जाते. 

मराठवाड्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

यावर्षी प्रतिष्ठानच्या वतीने राज्यातील २० जिल्ह्यांतील ७० दिव्यांग युवांना ३० डिसेंबरच्या मध्यरात्री सह्याद्री पायथ्याशी असलेल्या जाहिंगीरदारवाडी गावात एकत्र आणण्यात आले. दुसर्‍या दिवशी सकाळी मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेत लता पांचाळ आपल्या काही मैंत्रिणींच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झाली होती. कोणताही नकारात्मक विचार तिच्या मनाला शिवला नाही. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, कळसूबाई माता की जय, हर हर महादेव अशा घोषणा देत इतर दिव्यांगासोबत लताने शिखर चढाईसाठी कूच केली. 

हे ही वाचा : सरत्या वर्षात परभणी पोलिसांची चमकदार कामगिरी ; अनेक गुन्हे 100 टक्के उघडकीस, प्रतिबंधात्मक कारवाई देखील यशस्वी

या मोहिमेत सहभागी दिव्यांग एकमेकांना आधार देत एकमेकांचे मनोबल वाढवत होते. कळसूबाई शिखर सर करताना शेवटी येणार्‍या चार लोखंडी शिड्या लताने मोठ्या जिद्दीने पार केल्या व नववर्षाच्या पुर्वसंध्येला तिने हे शिखर सर केले. शिखराचा माथा गाठल्यावर सर्वांनी कडाक्याच्या थंडीत तंबूमध्ये मुक्काम केला. नववर्षाच्या पहाटे सह्याद्री पर्वताच्या माथ्यावर असलेल्या कळसूबाई मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. तसेच उगवत्या सुर्याला नमस्कार करुन सकाळी दहा वाजता परतीची वाट धरत खाली उतरण्यास सुरुवात केली. मोहिमेत सहभागी सर्व दिव्यांगांना शिवुर्जा प्रतिष्ठानच्या वतीने प्रमाणपत्र व पदक देवून सन्मानित करण्यात आले.

हे ही वाचा : परभणी : गुलाबी मैना, पिवळा धोबी, नकटा बदकाचे जिल्हात आगमन
 
जन्मत:च दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या लताला तीचे मामा प्रभाकर यांच्या आग्रहामुळे नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिंग माध्यमिक अंध विद्यालयात पहिली ते आठवीपर्यंत दिव्यांगासाठीचे विशेष शिक्षण घेता आले. त्यानंतर तिने १२वी पर्यंतचे शिक्षण नांदेडला राहूनच पुर्ण केले. पुढच्या शिक्षणाासाठी तिने पुणे गाठले. एस.पी.कॉलेजमधून बी.ए. केले असून सध्या ती पुण्यातील आकुर्डी भागात रामकृष्ण मोरे महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयात एम.ए.करीत आहे. तिने कॉम्प्युटरचे अनेक कोर्सेेस केलेले आहेत. वडील सुतारकीचा पारंपारिक व्यवसाय गावातच करतात.

नवीन वर्षानिमित्त अंध मुला-मुलींसाठी आयोजित केलेल्या कळसूबाई शिखर मोहिमेत सहभागी होण्याचा मी निर्धार केला होता आणि हे शिखर सर केल्याने आत्मविश्वास दुणावला आहे. शिखरावरुन खाली उतरताना काळजीपूर्वक पावले टाकावी लागत होती. कारण संपूर्ण वाट निसरडी होती. 
- लता पांचाळ, दिव्यांग

loading image
go to top