लेटलतिफ' अधिकाऱ्यांना दाखविला बाहेरचा रस्ता 

माधव इतबारे 
सोमवार, 2 जुलै 2018

औरंगाबाद : महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीला वेळेत हजर न राहणाऱ्या अधिकाऱ्यांना सभापती राजू वैद्य यांनी बाहेरचा रस्ता दाखविला. बेशिस्त असलेल्या एकाही अधिकाऱ्यांना बैठकीत प्रवेश द्यायचा नाही, असे फर्मान काढत त्यांनी सभागृहाची दारे बंद करून घेतल्याने बोटावर मोजण्या एवढ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. 2) बैठक पार पडली. 

महापालिकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांचा मनमौजी कारभार सुरू आहे. कोण अधिकारी कधी येतो, कधी जातो, याचा ताळमेळ नाही. विभागप्रमुखांनी दुपारच्या सत्रात कार्यालयात हजर राहावे, असे आदेश वारंवार काढले जातात. मात्र, त्याची अंमलबजावणी कधीच होत नाही. एवढेच काय स्थायी समिती, सर्वसाधारण सभेला देखील अधिकारी उशिराने येतात. सोमवारी सकाळी 11.30 वाजता स्थायी समितीची बैठक होती. सभापती वैद्य याच्यासह सदस्यांचे वेळेत सभागृहात आगमन झाले. 

यावेळी प्रभारी अतिरिक्त आयुक्त डी. पी. कुलकर्णी, मुख्यलेखाधिकारी रा.मा. सोळुंके, मालमत्ता अधिकारी वामन कांबळे, विद्युत विभागाचे उपअभियंता के. डी. कुलकर्णी यांच्यासह बोटावर मोजण्याएवढे अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे सभापतींचा पारा चढला. अधिकाऱ्यांनी शिस्त पाळलीच पाहिजे, यानंतर एकाही अधिकाऱ्यांना बैठकीत प्रवेश देऊ नये असे आदेश काढत त्यांनी दार बंद करून घेतले. त्यामुळे अधिकाऱ्यांची पंचायत झाली. पाऊण तास हे अधिकारी बैठकीबाहेर ताटकळत बसले होते. मात्र एकालाही प्रवेश देण्यात आला नाही.
 
Web Title: late come municipal corporation officer not allowed to sanding committee meting