कुठे सोयाबीन फुलोऱ्यात, तर कुठे उगवण अवस्थेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

यंदाची खरीप पेरणी काही भागांत वेळेवर तर काही भागांत तब्बल दीड महिना उशिरा झाल्याने पीक परिस्थितीत मोठी तफावत निर्माण झाली आहे. काही ठिकाणी सोयाबीन फुलोऱ्यात आले आहे, तर काही भागांत पिकांची उगवण होत आहे. त्याचा मोठा परिणाम रब्बी हंगामाच्या उत्पन्नावर होणार आहे. 
यंदा पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. तालुक्‍याची वार्षिक सरासरी 724 मिमी असताना केवळ 285 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ही सरासरी अतिशय कमी असून ग्रामीण भागातील काही गावांमध्ये पाणीटंचाईची भीषण परिस्थिती आहे. पुढील काळात पाऊस झाला नाही तर पाण्याची स्थिती गंभीर बनणार आहे. आजही तालुक्‍यातून वाहणाऱ्या मांजरा आणि तेरणा या दोन्ही नद्या कोरड्याठाक आहेत. शिवाय विविध मध्यम प्रकल्प, लघुप्रकल्पांत पाणी नाही. त्यामुळे पाणीटंचाईचे मोठे संकट निर्माण होणार आहे. 

निलंगा (जि. लातूर) : तालुक्‍यातील यंदाची खरीप पेरणी काही भागांत वेळेवर तर काही भागांत तब्बल दीड महिना उशिरा झाल्याने पीक परिस्थितीत मोठी तफावत निर्माण झाली आहे. काही ठिकाणी सोयाबीन फुलोऱ्यात आले आहे, तर काही भागांत पिकांची उगवण होत आहे. त्याचा मोठा परिणाम रब्बी हंगामाच्या उत्पन्नावर होणार आहे. 

यंदा पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. तालुक्‍याची वार्षिक सरासरी 724 मिमी असताना केवळ 285 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ही सरासरी अतिशय कमी असून ग्रामीण भागातील काही गावांमध्ये पाणीटंचाईची भीषण परिस्थिती आहे. पुढील काळात पाऊस झाला नाही तर पाण्याची स्थिती गंभीर बनणार आहे. आजही तालुक्‍यातून वाहणाऱ्या मांजरा आणि तेरणा या दोन्ही नद्या कोरड्याठाक आहेत. शिवाय विविध मध्यम प्रकल्प, लघुप्रकल्पांत पाणी नाही. त्यामुळे पाणीटंचाईचे मोठे संकट निर्माण होणार आहे. 

तालुक्‍यातील लांबोटा, दापका, सावरी, मानेजवळगा, नेलवाड, कासारशिरसी, कासार बालकुंदा, तांबाळा यासह आदी भागांत वेळेवर पाऊस झाल्याने त्या भागातील शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात पेरणी केली आहे. त्यामुळे तेथील पिकांची स्थिती समाधानकारक असली तरी फुलोरा आणि शेंगा लागलेल्या पिकाला मोठ्या पावसाची गरज आहे. तर निटूर, आंबुलगा, पानचिंचोली, गौर, मसलगा, शिरोळ, 
खडक उमरगा, बसपूर, कलांडी आदी भागात तब्बल दोन महिने उशिराने पेरणी झाल्यामुळे येथील पिके आता जमिनीच्या बाहेर आली असून तेथे कोळपणी आणि खुरपणी सुरू आहे.

काही महसूल मंडळांत वेळेवर तर काही महसूल मंडळांत उशिराने पेरणी झाल्यामुळे पिकांच्या परिस्थितीत मोठी तफावत निर्माण झाली आहे. काही भागांत पिकांना शेंगा लागल्या आहेत, तर काही भागांत पेरणी होऊन पंधरा ते वीस दिवस झाले आहेत. यामुळे खरीप हंगामाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे. सध्या पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतातुर असून जनावरांसाठी चारा नाही. त्यामुळे चारा छावण्या उभाराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. पिकांच्या उगवणीच्या फरकामध्ये मोठ्या कालखंडाची तफावत असल्यामुळे याचा परिणाम रब्बी हंगामावर होणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: late monsoon in nilanga