अखेर उड्डाणपूल जोडणीचे साहित्य ऑरिकमध्ये 

auric city
auric city

औरंगाबाद -  ऑरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीला जालना महामार्गाशी जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या दोन बाजू तयार आहेत. तथापि, रेल्वे रुळाशी जोडणीचे काम रखडले होते. या जोडणीसाठी आवश्‍यक साहित्य आता "ऑरिक'मध्ये यायला सुरवात झाल्याने "गंगेत घोडे न्हाले...' असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

ऑरिकमध्ये जाण्यासाठी शेंद्रा एमआयडीसीच्या रस्त्यांचा वापर करावा लागतो. या औद्योगिक शहराला आवश्‍यक असलेल्या स्वतंत्र रस्त्याची उभारणी अद्याप पूर्ण झालेली नाही. या नव्या स्मार्ट औद्योगिक शहरात जाण्यासाठी प्रस्तावित असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजू तयार झाल्या आहेत. रेल्वे रुळावरील उड्डाणपुलाच्या भागाच्या कामाला मिठी मारून बसलेले ग्रहण आता काहीसे सैल झाले आहे. औरंगाबाद- जालना महामार्गाला येऊन मिळणाऱ्या या उड्डाणपुलाच्या कामासाठी ऑरिकतर्फे नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराने पुलाच्या दोन्ही बाजू तयार केल्या आहेत आणि त्यांचे डांबरीकरणही पूर्ण केले आहे. मात्र, सुरवातीला रेल्वे विभाग आणि नंतर डिझाईनला रूप देणाऱ्या परराज्यातील कंपनीने केलेली दिरंगाई या उड्डाणपुलाच्या कामातील दिरंगाईला कारणीभूत ठरली. 
 
दोन वेळा वाढवली डेडलाइन 
ऑरिक आणि जालना महामार्गाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या उभारणीचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. या कामाला पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला दोन वेळा डेडलाइन वाढवून देण्यात आली. 15 ऑगस्टला 2018 या पुलाचे काम पहिल्यांदा पूर्ण होणे अपेक्षित असताना त्यावर पाणी फेरले गेले. त्यानंतर हे काम 15 डिसेंबर 2018 पर्यंत करणे अपेक्षित होते. मात्र, फेब्रुवारीत साहित्य दाखल झाल्याने हे काम लांबणीवर पडले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com