शरिरातील अवयव पाहण्याची लातूरकरांना दुर्मिळ संधी

Latukars will get a rare chance to see their organs
Latukars will get a rare chance to see their organs

लातूर : शरिरात कोणकोणते अवयव असतात, हे आपल्याला विज्ञानाच्या पुस्तकात पहायला मिळतात किंवा रुग्णालयाच्या भिंतीवरील पोस्टरवर; पण हेच अवयव प्रत्यक्ष पहायला मिळाले तर... निरोगी शरिरातील अवयवांबरोबरच वेगवेगळ्या रोगांनी ग्रासलेले अवयव पाहण्याची संधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध झाली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या रोगांपासून दूर राहण्याचा 'धडा'ही इथे येणाऱ्या प्रत्येकाला मिळत आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयाच्या सभागृहात मानवी अवयव प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. येथे मेंदू, ह्रदय, जठर, किडनी, यकृत, फुफ्फुस अशा वेगवेगळ्या अवयवांबरोबरच काही प्रतिकृतीही ठेवण्यात आल्या आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वेगवेगळे अवयव जतन करून ठेवले जातात. ते अवयव सर्वसामान्य नागरिकांनाही पाहता यावेत म्हणून वर्षातून एकदा अवयवांचे प्रदर्शन भरविले जाते. या प्रदर्शनाला शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच इतर नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

फुफ्फुसाला मोठे छीद्र कधी पडतात, लठ्ठ लोकांची चरबी यकृतात कशी जाते, यकृत निकामी कसे होते, क्षारयुक्त पाणी पिल्याने मुतखडा कसा होतो, किडनीवर कोणकोणते परिणाम होतात, उभे राहून पाणी पिल्याने कोणत्या अवयवावर ताण येतो... अशा अनेक गोष्टी येथे पहायला आणि शिकायला मिळत आहेत. इतकेच नव्हे ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर तातडीने मदत कशी करावी, याचे प्रात्यक्षिकही करून दाखविले जात आहे. महाविद्यालय विद्यार्थी येणाऱ्या प्रत्येकाला अवयवांची माहिती देत आहेत. हे प्रदर्शन उद्यापर्यंत (ता. 11) सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत पाहता येईल.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com