लातुरमध्ये कारच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

अपघात भीषण असल्याने शरद पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर सतीश कोयले हे गंभीर जखमी झाले होते
latur
laturlatur

देवणी (लातूर): कार झाडाला आदळून आलेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना देवणी- बोरोळ रस्त्यावर सोमवारी (ता. २६) रात्री घडली. शरद रामचंद्र पाटील (वय- ४४) व सतीश वैजनाथ कोयले (वय- ३५, दोघेही रा. बोराळ) अशी मृतांची नावे आहेत. देवणी येथील दैनंदिन काम अटोपून शरद पाटील व सतीश कोयले हे सोमवारी रात्री उशिरा आपल्या गावाकडे (बोरोळ) कारने (क्र. एमएच- ४८, ए- ५१९८) जात होते. दरम्यान, देवणी- बोरोळ रस्त्यावर कारची धडक झाडाला झाली. अपघात भीषण असल्याने शरद पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर सतीश कोयले हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर देवणी येथील ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून लातूरला हलविण्यात आले होते. मंगळवारी (ता. २७) दुपारी उपचारादरम्यान सतीश कोयले यांचे निधन झाले.

मृत शरद पाटील हे बोरोळ भाजपचे शाखाध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत सतीश कोयले हे अविवाहित असून, त्यांच्या पश्चात आई- वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

latur
Rolex Rings IPO: उद्या होणार रोलेक्स रिंग्जचा आयपीओ लाँच

गावावर शोककळा-

गावातील दोन्ही युवक सोबतच गेल्याने गावावर शोककळा पसरली आहे. मंगळवारी गावात एकही चूल पेटली नव्हती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com