लातूर : अहमदपूर पालिकेला महावितरणचा झटका

बिल न भरल्याने पाणीपुरवठ्याची वीज खंडित
Latur Ahmedpur Municipality power cut due non payment of bills
Latur Ahmedpur Municipality power cut due non payment of bills sakal

अहमदपूर : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची थकबाकी न भरल्याने नगर परिषदेस पाणी पुरवठा होणा-या ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला असून बुधवारी शहरातील जल शुद्धीकरणात येणारे पाणी बंद झाले.अहमदपूर नगर परिषदेच्यावतीने शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी लिंबोटी व जल शुद्धीकरण केंद्र या दोन ठिकाणाहून विद्युत पुरवठा केला जातो.

नगर परिषदेस लिंबोटी येथील महिन्याला साधरणपणे विस लाख तर जलशुद्धीकरण केंद्राचे साधारणपणे चार लाख असे एकूण जवळपास चोवीस ते पंचवीस लाख रुपये विज आकारणी भरणा करावा लागतो. एप्रिल २०२१ ते एप्रिल २०२२ या तेरा महिन्याच्या कालावधीत निव्वळ थकबाकी ५९ लाख ८७ हजार हजार आहे.या पैकी आज तारखेत १८ लाख रुपये नगर परिषदेने विज आकारणीपोटी भरले आहेत. नगर परिषदकडे सध्याची विज थकबाकी ४१ लाख असल्याने महावितरण विभागाने ११ एप्रिल रोजी पाणीपुरवठा संदर्भातील विद्युत जोडणी तोडल्याने पाणी पुरवठा बंद झाला आहे.

जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थी व सूचनेनंतर खंडित विद्युत पुरवठा चालू करण्यात येणार असला तरी बुधवारी दुपारी बाराला विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शहरातील प्रत्येक ठिकाणचा पाणी पुरवठा एक ते दोन दिवस लांबणार असल्याने नागरिकांना भर उन्हाळ्यात पाण्याची अडचण येणार आहे.शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या लिंबोटी धरणात मुबलक पाणी साठा असतानाही नागरिकांचे पाण्याचे हाल थांबता थांबेनात. कधी जल वाहिनी फुटणे, नैसर्गिक घटनेमुळे विद्युत पुरवठा खंडित होणे, कधी पाणी पुरवठ्याच्या यंत्रात बिघाड अशा घटना घडत असतानाच आज विज आकारणी न झाल्याने विद्युत पुरवठा खंडीत केला. नैसर्गिक व कृत्रिम अडचणीने पाणी पुरवठा सुरळीत राहत नसल्याने अहमदपूरकरांना नेहमीच पाण्याची अडचण येत आहे.

पाणी पुरवठ्या संदर्भात नेहमीच काहीना काही अडचणी येत आहेत. पाणी पुरवठा सुरळीत नसल्याने वर्ष भरात बऱ्याच वेळेस आम्हाला पाणी विकत घ्यावे लागत आहे.

- विजय पाटील, अहमदपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com