सरपंचाने मोडले कोरोनाचे नियम, ग्रामसेवकाने आकारला दहा हजारांचा दंड

Corona Rules Breaks For Marriage In Chakur Tahsil
Corona Rules Breaks For Marriage In Chakur Tahsil

चाकूर (जि.लातूर) : मांडरुकी (ता.चाकूर) गावातील सरपंचाच्या पुतणीच्या विवाह समारंभात ५० पेक्षा जास्त व्यक्ती जमवुन कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ग्रामसेवकाकडून दहा हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह समारंभास पन्नासपेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहु नये, असा आदेश असतानाही जास्ती व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये विवाह होत आहेत. मांडरूकी येथील सरपंच शंकर मोरगे यांची पुतणी व शिक्षक शिवकुमार मोरगे यांच्या मुलीचा सोमवारी (ता.पाच) सकाळी गावात विवाह समारंभ होता.

या विवाहासाठी पन्नास पेक्षा जास्त व्यक्ती जमा झाले असून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नसल्याची तक्रार जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार तहसीलदार डाॅ.शिवानंद बिडवे यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ, तलाठी एम. के. पाटील यांनी विवाह समारंभास भेट दिली.

यावेळी पन्नासपेक्षा जास्त व्यक्ती त्या ठिकाणी होत्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे कोरोना नियमांचे उल्लघंन केले म्हणून ग्रामसेवक रमाकांत तोगरगे यांनी गिरीजाबाई बळीराम मोरगे यांच्या नावाने दहा हजार रूपयाचा दंड लावला आहे. विवाहास जास्त व्यक्ती जमा केले म्हणून दंड लावण्यात आल्याची तालूक्यात पहिलीच घटना आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com