तक्रारी सोडवण्यासाठी पोलीस अधीक्षक आठवड्यातील दोन दिवस उदगीरात

युवराज धोतरे
Wednesday, 27 January 2021

नागरिकांची ही अडचण ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी आठवड्यातील दोन दिवस उदगीरला जाऊन नागरिकांच्या तक्रारी सोडण्याचे नियोजन केले आहे.

उदगीर (लातूर): लातूर-उदगीर रस्त्याचे काम चालू असून यामुळे सामान्य नागरिकांना जिल्हा कार्यालयाला जाणे कठीण बनले आहे. वाहतुकीची ही अडचण ओळखून नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याच्या संदर्भाने जिल्हा पोलीस अधीक्षक दोन दिवस उदगीरात येऊन नागरिकांच्या तक्रारी सोडवणार आहेत.

उदगीर लातूर रस्त्याचे सध्या काम  सुरू असून यामुळे लातूरला जाण्या-येण्यासाठी तब्बल दोन ते तीन तास वेळ लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी संदर्भात वरिष्ठ कार्यालयाला जाणे-येणे  करणाऱ्यांना कठीण बनले आहे. नागरिकांची ही अडचण ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी आठवड्यातील दोन दिवस उदगीरला जाऊन नागरिकांच्या तक्रारी सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यानुषंगाने बुधवारी (ता.२७) याची सुरुवातही त्यांनी केली असून ते आज मुक्कामी राहणार आहेत.

हिंगोलीच्या रामलिला मैदानावरील वॉकिंग ट्रॅकवर पालकमंत्र्यांनी केली मॉर्निंग वॉक

येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात ते नागरिकांना भेटणार आहेत. दर आठवड्याचा बुधवार जर बुधवारी शक्य नसेल जर गुरुवारी व आठवड्याच्या गुरुवारी जर गुरुवार शक्य नसेल तर शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव हे मुक्कामी राहुन नागरिकांच्या अडचणी सोडणार आहेत.

त्यांच्या या निर्णयामुळे उदगीर तालुक्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून पोलीस विभागाशी निगडित असलेल्या तक्रारीसाठी लातूरला जाण्याची नागरिकांना गरज उरली नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक उदगीरला येणार असल्याने नागरिकांशी त्यांचा थेट संपर्क येणार आहे. त्यामुळे तक्रारीचा निपटारा लवकर होणार आहे.

Crime News: सहायक निबंधकांना मारहाण; गृहनिर्माण संस्थेच्या माजी अध्यक्षाला अटक

शहर व ग्रामीण पोलिसांचे धाबे दणाणले....
जिल्हा पोलीस अधीक्षक मुक्कामी उदगीरात दाखल झाल्याने शहर व ग्रामीण पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. वरिष्ठ अधिकारी आल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी या पोलिसांना आता अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ग्रामीण व शहर पोलीस अलर्ट झाले आहेत.

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur breaking news Superintendent of Police in udgir two days a week to resolve complaints