
शहरात गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. याला रुग्णवाहिकाही अपुरी पडत आहे. त्यामुळे आता महापालिकेने शहरातील नागरीकांसाठी असलेल्या सीटी बसलाच रुग्णवाहिकेत रुपांतर केले आहे. यातून आता कोरोनाचे सौम्य लक्षणे असलेल्या तसेच संशयित रुग्णाची ने आण केली जाणार आहे.
लातूर : शहरात गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. याला रुग्णवाहिकाही अपुरी पडत आहे. त्यामुळे आता महापालिकेने शहरातील नागरीकांसाठी असलेल्या सीटी बसलाच रुग्णवाहिकेत रुपांतर केले आहे. यातून आता कोरोनाचे सौम्य लक्षणे असलेल्या तसेच संशयित रुग्णाची ने आण केली जाणार आहे.
ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...
शहरात महापालिकेकडे सध्या दोन रुग्णवाहिका आहेत. त्यात गेल्या काही दिवसापासून शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. बाधित रुग्णांची संख्या साडे तीनशेवर गेली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. त्यात महापालिकेकडे दोनच रुग्णवाहिका आहेत. यातून रुग्णांची ने आण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे मार्चपासून बसून राहिलेल्या सीटी बसचा उपयोग केला जाणार आहे.
बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका
प्रायोगिक तत्तावर सध्या एका सीटीबसचे रुपांतर रुग्णवाहिकेत करण्यात आले आहे. बस चालकाचा भाग हा एक प्रकारे सीलबंद असणार आहे. पाठीमागे बसलेल्या रुग्णांचा त्यांचा संपर्क येणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. सीटी बसवर रुग्णवाहिका असे नावही टाकण्यात आले आहे. रुग्ण संख्या वाढत गेली तर आणखी सीटी बसला असे रुग्णवाहिकेच रुप दिले जाणार आहे. रविवारी या रुग्णवाहिकेची महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त देविदास टेकाळे, उपायुक्त शशीमोहन नंदा यांनी पाहणी केली.
प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!
पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार सीटी बसचे रुपांतर रुग्णवाहिकेत करण्यात आले आहे. कोरोना संशयित व सौम्य लक्षणे असणाऱया कोरोना बाधित व्यक्तींची ने आण करण्याकरिता ही रुग्णवाहिका काम करणार आहे. महापालिकेच्या कोविड केअर सेंटरपासून ते बारानंबर पाटी येथे असलेल्या विलगीकरण कक्षापर्यत रुग्णांची ने आण यातून केली जाणार आहे. ५० टक्के क्षमतेनेच रुग्ण बसवण्यात येणार आहेत. प्रत्येक फेरीला बसचे निर्जतुकीकरण करण्यात येणार आहे. तसेच रुग्ण संख्या वाढली तर आणखी पाच सीटी बसचे रुपांतर रुग्णवाहिकेत करण्यात येणार आहे.
विक्रांत गोजमगुंडे, महापौर.
( संपादन: प्रताप अवचार)