esakal | 'बेडची संख्या वाढणार, रुग्णांची दोन दिवसांत सोय करणार'
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19

'बेडची संख्या वाढणार, रुग्णांची दोन दिवसांत सोय करणार'

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

उदगीर (लातूर): प्रशासनाच्या वतीने सध्या ऑक्सिजन बेड वाढवण्याचे काम युद्धपातळीवर चालू झाले आहे. येत्या दोन दिवसांत एकाही रुग्णाला परत जाऊ देणार नसल्याची ग्वाही उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यानी दिली आहे.

येथील सामान्य रुग्णालयात सध्या ऑक्सिजन बेडची वानवा सुरू आहे. दररोज दोनशे ते अडीचशे रुग्ण वाढत आहेत या परिस्थितीत शहरातील खाजगी रुग्णालयासह शासकीय रुग्णालयातही बॅड शिल्लक नसल्याची स्थिती आहे. जेवढे रुग्ण उपचार पूर्ण झालेले आहेत व त्यांना सुट्टी दिलेली आहे तेवढेच बेड उपलब्ध होत आहेत. त्यामुळे मृत्यूचा दर वाढलेला आहे त्यामुळे सध्या कोरोनाची परिसरात दहशत असल्याचे दिसून येते.

सध्या सामान्य रुग्णालय उदगीर लाॅयन्स हॉस्पिटल व तोडार पाटी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह येथील केअर सेंटर मध्ये उपचार करण्यात येत आहेत. येथे बेड कमी पडत असल्याने प्रशासनाच्या वतीने तोंडार पाटी येथे चाळीस बेड व येथील जय हिंद पब्लिक स्कूल वसतिगृहात वाढीव ऑक्सिजन बेडची सोय करण्यात येत आहे. शिवाय येथील पशुवैद्यक महाविद्यालयाच्या वसतिगृहातही वाढीव बेडचे काम युद्धपातळीवर चालू आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात या भागातील रुग्णांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे श्री मेगशेट्टी यांनी सांगितले.

सध्या उदगीर येथील संख्या ही साडे पाच हजाराच्या घरात पोहोचली आहे.आतापर्यंत एकूण १२४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या ९९० रुग्णांवर उपचार चालू असून पैकी सातशे चार रुग्ण होम आयसोलेशनचा उपचार घेत आहेत. दररोज दोनशे ते अडीचशे रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती कोरणा रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. शशिकांत देशपांडे यांनी दिली आहे.

विद्यावर्धिनी शाळेत होम आयसोलेशन

येथील विद्यार्थिनी शाळेत जे पॉझिटिव्ह रुग्ण होम आयसोलेशन करणार आहेत त्यांची सोय करण्यात आली आहे. या रुग्णांवर वेळोवेळी मार्गदर्शन उपचार करण्यासाठी येथे एक टीम नियुक्त करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे ज्या रुग्णाना सौम्य लक्षण आहेत व ज्यांना घरी आयसोलेशन करणे शक्य नाही त्यांच्या आयसोलेशनाची सोय होणार आहे. या शाळेची इमारत कर्मचारी व सेवक यांच्यासह महसूल प्रशासनाने ताब्यात घेतली असल्याचे उपजिल्हाधिकारी श्री मेगशेट्टी यांनी सांगितले