चाकूचा धाक दाखवत गोदामातील स्वस्त धान्याची चोरी

युवराज धोतरे
Sunday, 10 January 2021

आरोपींनी गोदामाचे कुलुप तोडून कर्तव्यावर असलेले वाचमॅन मोहम्मद हाजी बागमारू यांना चाकूचा धाक दाखवून धान्याची चोरी केली आहे.

उदगीर (जि.लातूर) : दिवसाढवळ्या चाकूचा धाक दाखवून शिवीगाळ करत चोरी केली आहे. दोन आरोपींनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी असलेल्या शासकीय गोदामातील स्वस्त धान्याची चोरी केली आहे. नंतर या धान्याची समोरच्या दुकानात विक्री केल्याप्रकरणी तिघांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलिंसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शनिवारी (ता.९) सायंकाळी चारच्या सुमारास आरोपी प्रशांत मनोहर जाधव (रा.गांधीनगर) व भीमा तुळशीराम वाघमारे (रा.एसटी कॉलनी) यानी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी असलेल्या शासकीय गोदामाजवळ येऊन गोदामाचे कुलुप तोडून कर्तव्यावर असलेले वाचमॅन मोहम्मद हाजी बागमारू (वय-५५) याना चाकुचा धाक दाखवुन शिवीगाळ दमदाटी केली.

लातूर जिल्ह्यातील शेकडो कोंबड्या कशामुळे मृत पावल्या? परिसरात भीती

नंतर शासकीय कामात अडथळा करत जबरदस्तीने 120 किलो गहू ज्याची किंमत २५२० रूपये व 30 किलो गहु ज्याची किंमत नऊशे रूपये असा एकुण ३५१० रुपयांचा माल चोरी करून समोरच्या काचवावार याच्या दुकानात विकला आहे.

वॉचमन श्री बागमारू यांच्या फिर्यादीवरून चोरी केलेली दोन आरोपी व स्वस्त धान्य विकत घेणारा दुकानदार अशा तीन आरोपीवर येथील शहर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा करून चाकूचा धाक दाखवून जीवनावश्यक स्वस्त धान्याची चोरी केल्याचा गुन्हा रविवारी पहाटे दाखल करण्यात आला आहे.

अर्ध्यावरती डाव मोडला... अपघातात पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी

तिन्ही आरोपी अटकेत-
पोलिस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली. या प्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी पहाटेच तिन्ही आरोपींना अटक केली आहे. यासाठी बीबी शाखेचे राजीव घोरपडे, श्रीकृष्णा चामे, योगेश फुले अदीनी पुढाकार घेतला. या आरोपींना येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur crime news udgir theft warehouse looted with knife threat