गाडीवर अंबर दिवा असूनही केले चोरीचे धाडस

निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांची चोरट्यांनी फोडलेली कार.
निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांची चोरट्यांनी फोडलेली कार.

लातूर ः येथे एका लग्नसमारंभासाठी आलेल्या निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या कारची काच फोडून चोरट्यांनी 25 हजार रुपये व एक चेकबुक चोरून नेले आहे. येथील रिंगरोडवर बुधवारी (ता. 20) दुपारी ही घटना घडली. या कारमध्ये अंबर दिवा असतानाही चोरट्यांनी ही कार सोडली नसल्याचे दिसून आले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 


येथील औसा रोड ते बार्शी रोडवरील पोदार शाळेच्या परिसरात असलेल्या एका मंगल कार्यालयात एका लग्नसमारंभासाठी निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव आले होते. ते कुटुंबीयांसमवेत आले होते. मंगल कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर कार (एमएच- 12, पीएन- 9846) लावून ते मंगल कार्यालयात गेले होते. लग्न लागल्यानंतर त्यांचा चालक प्रवीण बांदल हाही जेवणासाठी कार्यालयात गेला. 


कारमध्ये कोणीच नाही हे पाहून चोरट्यांनी कारच्या मागच्या बाजूची काच दगडाने फोडली. आतमधील बॅग घेऊन ते पसार झाले. जाता-जाता त्यांनी या बॅगमधील 25 हजार रुपये व एक चेकबुक नेले; तसेच इतर कागदपत्रे असलेली ही बॅग नालीत टाकून चोरटे निघून गेले.

जेवण झाल्यानंतर चालक बांदल हा कारजवळ आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या कारवर अंबर दिवा असतानाही चोरट्यांनी कार फोडून चोरी केली आहे. श्री. जाधव हे निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक असल्याने पोलिस यंत्रणाही तातडीने हलली.

श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले; तसेच विशेष पथकही नियुक्त करण्यात आले. कारच्या जवळ असलेल्या एका नाल्यात पोलिसांना कारमधून चोरलेली बॅग सापडली. याप्रकरणी कारचालक प्रवीण बांदल यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com