लातूर : देवणी तालुक्यात 'बिबट्याची' दहशत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

leopard

लातूर : देवणी तालुक्यात 'बिबट्याची' दहशत

देवणी : बिबट्याच्या शोधात बुधवारी वनविभागाने शोधमोहिम तीव्र केली आहे. तालुक्यातील कोरेवाडी भागात बिबट्याचे आढळल्याने शेतकरी धास्तावले असून वनविभागाच्या वतीने शोधमोहिम जारी करण्यात आली आहे. बुधवारी दिवसभर तालुक्यात बिबट्याच्या अस्तित्वाचा शोध सुरू असून पूर्व व दक्षिण भागात बिबट्याचा शोध घेण्यात येत आहे.

तालुक्यातील कोरेवाडी भागात दोन दिवसांपासून बिबट्याचे अस्तित्व आहे. वाघाने कोरेवाडी शिवारात मंगळवारी दुपारी शेतीत काम करीत असलेल्या दत्ता माधवराव अर्जुने या शेतकऱ्यावर हल्ला करीत त्याला गंभीर जखमी केले. सध्या गंभीर जखमी असलेल्या दत्ता अर्जुनेवर लातुर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिबट्याचे अस्तित्व व झालेल्या हल्यामुळे गावागावातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

तालुक्यातील टाकळी, वडमुरंबी, लासोना, बटनपूर, सिंधीकामठ भागासह मांजरा नदीच्या पट्यात बुधवारी दिवसभर बिबट्याच्या शोधात पथके फिरत असून दिवसभरात कोणताही मागमूस लागला नाही.

उपचारही मिळेनात

मंगळवारी दुपारी बिबट्याच्या हल्ल्यानंतर वलांडी येथील प्राथमिक अरोग्य केंद्रात दत्ता अर्जुने यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथे केवळ जखमेवर आयोडिन टाकण्यात आले अन्य कोणताही उपचार अथवा उपचारासंदर्भात साधा सल्लाही देण्यात आला नाही. शेवटी वलांडी येथील खासगी रुग्नालयात उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना लातुरला हलवण्यात आले.

संबंधित प्राण्याच्या पावलाचे ठसे घेण्यात आले असून मंगळवारी सांयकाळनंतर कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शेतशिवारातील नागरीकांनी व उसतोड टोळ्यांनी गावाच्या आसऱ्याला येऊन संरक्षण करणे अपेक्षित आहे. जखमीचा उपचाराचा खर्च वनविभाग करणार असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्कता बाळगावी.

- शिला गिते वनपरिक्षेत्र अधिकारी लातूर

Web Title: Latur Devani Leopard Attack Farmer Injured Forest Department Search Operation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top