esakal | Corona Breaking : लातूरात कोरोनाचा कहर; तीघांचा मृत्यू, तर एकाच दिवशी ५८ जणांना लागण
sakal

बोलून बातमी शोधा

corona death.jpg

मागील काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. एकीकडे कोरोनाची लागण होणाऱयांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे मात्र कोरोनाने ज्येष्ठ नागरीकांचा जीव जात आहे. सोमवारी (ता. १४) कोरोनामुळे तीघांचा बळी गेला आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३८ वर गेली आहे.

Corona Breaking : लातूरात कोरोनाचा कहर; तीघांचा मृत्यू, तर एकाच दिवशी ५८ जणांना लागण

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : मागील काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. एकीकडे कोरोनाची लागण होणाऱयांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे मात्र कोरोनाने ज्येष्ठ नागरीकांचा जीव जात आहे. सोमवारी (ता. १४) कोरोनामुळे तीघांचा बळी गेला आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३८ वर गेली आहे.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचा उपचार सुरु असताना तीघांचा मृत्यू झाला आहे. यात उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उदगीरमधील हनुमान कट्टा येथील रहिवाशी असलेल्या ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचा मधुमेह व उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना निलंगा येथील खतीब गल्लीतील रहिवाशी ४८ वर्षीय व्यक्तीला कोरोनामुळे प्राण गमावावे लागले. या व्यक्तीला मधुमेहाचा त्रास होता. तर औसा येथील खडकपुरा भागातील ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरीकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या व्यक्तीला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. या तीघांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ३८ वर गेला आहे.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

दरम्यान सोमवारी जिल्ह्यातील ५८ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. हा आतापर्यंतचा उच्चांकी आकडा आहे. यात सुमारे २७ रुग्ण हे लातूर शहरातील आहेत. तसेच उदगीरच्या कोविड केअर सेंटरमधून एक, सामान्य रुग्णालयातून एक तर येथील मुला मुलीच्या वसतिगृहात असलेल्या कोविड केअर सेंटरमधून १५ अशा एकूण १७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

(संपादन : प्रताप अवचार) 

loading image