लातुरातील ७० विद्यार्थी ठरले ‘शतक’वीर

file photo
file photo

राज्यभरातून कौतूकाचा वर्षाव; निकालानंतर ‘लातूर पॅटर्न’ चर्चेत

लातूर : मेहनत आणि जिद्दीच्या बळावर राज्यातील १२५ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत शंभरपैकी शंभर गुण मिळवले आहेत. त्यात लातूर विभागातील तब्बल ७० विद्यार्थ्यांच्या समावेश आहे. त्यांनी ‘लातूर पॅटर्न’चा झेंडा आणखी उंचावर नेला आहे. त्यामुळे या ‘शतक’वीरांवर सध्या राज्यभरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ऑनलाईन पद्धतीने शुक्रवारी हा निकाल जाहीर झाला. त्यावेळी लातूरातील ७० विद्यार्थ्यांना शंभर पैकी शंभर टक्‍के गुण मिळवून निकालावर आपली वेगळी मोहोर उमटवली आहे. लातूरपाठोपाठ आैरंगाबादमधील २३ तर कोल्हापूरमधील ११ विद्यार्थ्यांनी शंभर टक्के मिळवले आहेत. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात केवळ चार विद्यार्थ्यांनी ‘शतक’ गाठले आहे.

लातूर विभागाचा ८६.३० टक्के निकाल लागला आहे. ११०८२८ विद्यार्थ्यांपैकी ९५६४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील २७ हजार १०५ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण तर ३३ हजार ७७२ विद्यार्थ्यांनी ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. ३५ टक्के गुण मिळविणारे ७ हजार २८५ विद्यार्थी आहेत. या निकालात शंभरपैकी शंभर गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

शंभर टक्‍के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची मंडळनिहाय संख्या
लातूर – 70
औरंगाबाद – 23
कोल्हापूर – 11
अमरावती – 6
पुणे – 4
मुंबई – 4
कोकण – 4
नागपूर – 2
नाशिक – 1
एकूण – 125

हे आहेत ‘शतक’वीर
वैष्णवी स्वामी (श्री केदारनाथ माध्यमिक विद्यालय), आदित्य अजय रेणापुरे (श्री केशवराज विद्यालय), निखिल काकासाहेब सरवदे (श्री केशवराज विद्यालय), निकिता कमलाकर शिंगारे (देशिकेंद्र विद्यालय), सुषमा भागवत खटाळ (ज्ञानप्रकाश विद्यालय), रेणूका विकास पडवळ (देशिकेंद्र विद्यालय), नंदिनी डांगे (जिजामाता कन्या प्रशाला), वैष्णवी बंडापल्ले (जिजामाता कन्या प्रशाला), साक्षी कदम (महात्मा फुले विद्यालय), स्नेहा केंद्रे (महात्मा फुले विद्यालय), श्रेयश देशमुख (महात्मा फुले विद्यालय).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com