esakal | लातूर जिल्ह्यातील निवडणुका स्वबळावर लढणार; अमित देशमुख यांची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

amit deshmukh

लातूर जिल्ह्यातील निवडणुका स्वबळावर लढणार; अमित देशमुख यांची घोषणा

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (जि. लातूर) : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात होऊ घातलेल्या निवडणुका काँग्रेस (congress) स्वबळावर लढणार असल्याची घोषणा पालकमंत्री अमित देशमुख (amit deshmukh) यांनी शुक्रवारी (ता.१०) येथे केली आहे. येथील शिवाजी महाविद्यालयात आरटीपीसीआर लॅब व ऑक्सीजन टॅंक लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे अध्यक्षस्थानी होते. जिल्हाधिकारी बी पी पृथ्वीराज, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, आरोग्य उपसंपादक डॉ एकनाथ माले, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेश्वर निटुरे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ लक्ष्मण देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, उपसभापती रामराव बिरादार, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, विजय निटुरे मंजूरखा पठाण, समीर शेख, उबा काबळे, सुर्यशिला मोरे, प्रीती भोसले, डॉ सतीश हरिदास आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा: "इंग्लंड क्रिकेट बोर्डाने तेव्हा काय केलं होतं विसरू नका"

यावेळी पालकमंत्री श्री देशमुख म्हणाले, कोरोणाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये राज्यामध्ये आरोग्य विभागाचे काम पहिल्या क्रमांकावर आहे. मराठवाड्यातील तालुकास्तरावरील पहिली कोरोना तपासणी प्रयोगशाळा उदगीरला होत आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर ऑक्‍सिजन कमी पडू नये म्हणून ऑक्सिजन टॅंकची सोय करण्यात आली आहे. या भागातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यात कोरोना काळात लोकांची सेवा करण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे. यापुढेही उदगीरला आरोग्याच्या बाबतीत सुटले कमतरता भासू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केल्याप्रमाणे स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे या हेतूने सर्व जागा लढवून कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे ही भावना काँग्रेसची आहे. निवडणुकीनंतर आघाडी होणारच आहे याची आठवण त्यांनी यावेळी करून देवुन श्री बनसोडे तुम्ही तिकडून भाषण द्यायचे आणि मी ईकडून भाषण देणार आहे. शेवटी तुम्हाला भाषण लिहून देणारा माझ्या ओळखीचाच असल्याचे सांगून यावेळी पालकमंत्र्यानी कोपरखळी मारली.

यावेळी राज्यमंत्री श्री बनसोडे म्हणाले उदगीर मतदार संघामध्ये गेल्या अनेक वर्षापासूनचा असलेला अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. पालकमंत्र्यांच्या सहकार्याने या भागातील प्रश्न विकास कामे व आवश्यक असणारा निधी दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये भरभरून मिळाला आहे यापुढेही मिळत राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

निराधार कमीट्या काँग्रेसला द्याव्यात...

यावेळी माजी नगराध्यक्ष श्री निटुरे यांनी आमदार, राज्यमंत्री राष्ट्रवादीचे पंचायत समिती आम्ही राष्ट्रवादीला दिली त्यामुळे उदगीर तालुक्यातील निराधार कमिट्या शंभर टक्के काँग्रेसला द्याव्यात अशी मागणी पालकमंत्र्यांच्या उपस्थित केली. त्यावेळी श्री नागराळकर यांनी आपल्या भाषणात कितीही आघाडी झाली तरी कुकवाची ही कुंकवाची असते आणि आघाडीचा धर्म ठरल्याप्रमाणे पाळला जातो असे सांगितले.

हेही वाचा: Video : जम्मू काश्मीरमध्ये राहुल गांधींनी दिला 'जय माता दी'चा नारा

पालकमंत्र्यांच्या कोपरखळीने राज्यमंत्र्यांसह नेतेमंडळीही घायाळ...

पालकमंत्री श्री देशमुख यांच्या भाषणाची सुरुवात झाली ती देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या सत्ता नाट्यापासून.. त्यावेळी श्री बनसोडे हे विमानतळाकडे असताना राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस श्री नागराळकर तुम्ही कोठे होतात असा प्रश्न उपस्थित करताच हशा पिकला.. जिल्हा परिषद अध्यक्ष श्री केंद्रे अध्यक्षपदाचा जिल्हा परिषदेत फॉर्म भरला असताना पालकमंत्री देशमुखी यांनी काँग्रेसचा फॉर्म परत घेण्यास सांगितले व मला बिनविरोध निवडून दिले ह्या बद्दल धन्यवाद मानले... त्याला उत्तर देताना पालकमंत्री देशमुख यांनी भाजपात तुमची घुसमट होत असून काँग्रेसमध्ये व्यक्तिस्वातंत्र्य आहे ईकडेच या असे आवाहन केले.

राज्यमंत्री बनसोडे तुम्ही अजिबात घाबरू नका विरोधी पक्षाकडे आता पर्याय नाही आणि जर असेलही तर राहुल केंद्रे ती अडचण दूर करतील तुम्ही बिनधास्त राहा असा सल्ला देताच पुन्हा हशा पिकला...

loading image
go to top