लातूर : दीड लाख हेक्टर क्षेत्र गोगलगायींकडून फस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Snails Danger to crops

लातूर : दीड लाख हेक्टर क्षेत्र गोगलगायींकडून फस्त

लातूर : जिल्ह्यात पहिल्यांदाच शेतकऱ्यांना नवीन संकटाला सामोरे जावे लागत आहे. शंखी गोगलगायीने हळूहळू पाय पसरत पसरत जिल्ह्यातील दीड लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र आपल्या कवेत घेतले आहे. या क्षेत्रावरील सोयाबीनचे या शंखी गोगलगायीने नुकसान केले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालातील ही माहिती असली तरी अंतिम पंचनाम्यात हे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांचे दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे नुकसान होत आहे. पिकावरील तर वेगवेगळे रोग हे तर नेहमीचेच आहे. यातून हातात आलेले पिकही निघून जात आहे. यावर्षी जून व जुलै मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. जिल्ह्यात आजपर्यंत ५३० मिलीमीटर पाऊस झाला आहे. जुन व जुलै या दोन महिन्याचे सरासरी पाऊस ३२२ मिलीमीटर असताना प्रत्यक्षात मात्र ४६४ मिलीमीटर पाऊस झाला. म्हणजे १४४ टक्के पाऊस झाला. जिल्ह्यातील २२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली होती. त्यात अनेक दिवस संततधार राहिली. याचा परिणाम या वर्षी प्रथमच शंखी गोगलगायीने डोके वर काढले.

एक महिन्याच्या आत या शंखी गोगलगायीने जिल्ह्यातील दीड लाखा पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्र आपल्या कवेत घेतले आहे. या सर्व क्षेत्रावरील सोयाबीन त्यांनी एक प्रकारे खावून टाकले आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्याना बसला आहे. कृषी विभागाच्यावतीने आता अंतिम पंचनामे केले जात असून हे क्षेत्र अधिक वाढणार आहे. जिल्ह्यातील या नुकसानीची कृषीमंत्री अब्दुल सत्तार व कृषी सचिव एकनाथ डवले यांनी पाहणी केली. शासन किती भरपाई देणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

शंखी गोगलगायीच्या प्रादूर्भावामुळे झालेल्या

शेतीपिकाच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल

तालुका प्रत्यक्ष पेरणी हेक्टरमध्ये गोगलगाय प्रादूर्भाव क्षेत्र हेक्टरमध्ये प्रादूर्भावाची टक्केवारी

लातूर ६९,२३७ १६,८९८ २६.४७

औसा ९९,१७६ १९,७८५ २९.१२

निलंगा ९५,५५३ २७,२४७.५० ३५.००

रेणापूर ४६,००० १३,५२३ २९.४०

शिरुर अनंतपाळ २६,२२९ ८,९४७ ३८.५५

उदगीर ६१,७१० १३,१४१ २७.९५

जळकोट २८,९९६ ६२७९.०८ २९.००

देवणी ३३,८१० २४,५८६ ९६.८१

अहमदपूर ६४,३०८ १३,४१८ २९.०५

चाकूर ५८,६५२ १३,७४२ २८.३०

एकूण ५,८३,६७१ १,५७,५६६.५८ ३३.६९

Web Title: Latur Farmer Agriculture Loss Farm Infested By Snails

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..