esakal | Latur Good News : आता सात दिवसाला पाणी; कोणत्या भागासाठी कोणता वार, वाचा सविस्तर..
sakal

बोलून बातमी शोधा

लातूर वॉटर.jpg
  • मांजरा धरणात पाणी वाढल्याने महापालिकेचा निर्णय, 
  • आता सात दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जाणार आहे.
  • अंमलबजावणी सोमवार (ता. तीन) पासून केली जाईल. 
  •  गेल्या वर्षीपासून शहराला दहा दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत असे. 

Latur Good News : आता सात दिवसाला पाणी; कोणत्या भागासाठी कोणता वार, वाचा सविस्तर..

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : मांजरा धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्‍याने धरणातील मृतसाठ्यात ३८ दशलक्षघनमीटर पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने शहराला आता सात दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जाणार आहे. याची अंमलबजावणी सोमवारपासून (ता. तीन) केली जाणार आहे. गेल्या वर्षीपासून शहराला दहा दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जात होता. शहराच्या प्रत्येक भागाला सात दिवसातून एकदा पाणी दिले जाणार आहे. रविवारी मात्र सर्व पंप बंद ठेवण्यात येणार आहेत. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

सोमवारी (ता. तीन) शासकीय कॉलनी जलकुंभावरून श्रीनगरचा काही भाग (पीर टेकडी), सोहेलनगर, हरदेवनगर, दिपज्‍योतीनगर, अजिंठा नगर, शंभुनगर, हडको कॉलनी, विठ्ठल रुक्‍मीणीनगर, सय्यद नगर, अवंती नगर, इत्‍यादी. बसवेश्‍वर जलकुंभावरून एलआयसी कॉलनी, कव्हा व कन्हेरी रोड पोष्‍टल कॉलनी, संभाजीनगर, शंकरपुरम, मंत्रीनगर पुर्व भाग. राजधानी जलकुंभावरून  सिग्‍नल कॅम्‍प, सुतमिल रोड, विवेकानंदपुरम्,  बोधे नगर, शिवाजीनगर, ठाकरे चौक, जयक्रांती कॉलेज, गांधीनगर, गजानननगर, खोरी गल्‍लीचा सर्व परिसर, हमाल गल्‍ली आदी भाग. तर आर्वी जलकुंभावरून अंबाजोगाई रोडवरील भाग आर्वी गायरान, भगवान बाबानगर, हनुमाननगर, सोमवंशीनगर, गडदेनगर, म्‍हैसूर कॉलनी, धायगुडेनगर भागाला पाणी पुरवठा केला जाणार आहे.

मंगळवारी (ता. चार) शासकीय वसाहत जलकुंभावरून गिरवलकरनगर, पंचवटीनगर, न्‍युभाग्‍यनगर, आम्‍लेश्‍वरनगर, चौधरीनगर, कुलस्‍वामीनीनगर, सोनानगर इत्‍यादी. बसवेश्‍वर जलकुंभावरून मंत्रीनगर पश्चिम भाग, अंबिकानगर, ज्ञानेश्‍वर नगर, एलआयसी कॉलनीचा काही भाग, इंद्रायणीनगर, विराट हनुमान, कृषि कॉलनी, आदर्श कॉलनी, नारायणनगर पशुपतीनाथनगर, श्रीनगर, पारिजात मंगल कार्यालयाच्‍या पाठीमागे, औसारोड. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलकुंभावरून श्रीनगर, शिवगंगानगर, क्रांतीनगर, अग्रोयानगर, कपीलनगर, स्‍वामी समर्थनगर आदी भाग. आर्वी जलकुंभावरून इंडिया नगर, केशवनगर, हुसेनिया कॉलनी, एस. टी. कॉलनी, सुळ नगर, बजरंग चौक, टाके नगर, एलआयसी रोड, अर्धा साई रोडला पाणी दिले जाणार आहे. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

बुधवारी (ता. पाच) सरस्‍वती जलकुंभावरून गायत्रीनगर, महसूल कॉलनी, सैनिक कॉलनी, वैभव नगर, सौभाग्‍यनगर, साईधाम, जुना औसारोडचा भाग,  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलकुंभावरून इंडियानगर, सुभेदार रामजी नगर, बोधी चौक, बॅंक कॉलनी, शामनगर, विशालनगर,  कल्‍पनानगर, पद्मानगर, विशालनगर,  खाडगाव रोड, नांदेड नाका जलकुंभावरून  नाथनगर, मळवटी रोड, भारत सोसायटी, गवळीनगर, सिध्‍देश्‍वरनगर, संत गोरोबा सोसायटी, शास्‍त्रीनगर, इंदिरानगर, राजीवनगर, पंचवटीनगर, श्रीनगर, साठेनगर, जयभिम नगर, लेबर कॉलनी आदी भाग. आर्वी जलकुंभावरून मित्रनगर, खोरी गल्‍ली, आयशा कॉलनी, ज्ञानेश्‍वरनगर, महेबुबनगर, संगीत महाविदयालय लाईन, जाफरनगर, गुरुकृपा कॉलनी, मुक्‍ताईनगर, आर्धा साई रोड सप्‍लाय, टाकेनगर.

गुरुवारी (ता. सहा) सरस्‍वती जलकुंभावरून तुळजा भवानीनगर, गौतमनगर, यमुना सोसायटी, सरस्‍वती कॉलनी, लक्ष्‍मीधाम, गुलटेकडी, गायत्रीनगरचा काही भाग. नांदेड नाका जलकुंभावरून सिध्‍दार्थ सोसायटी, हरिभाऊनगर, स्‍वातंत्र सैनिकनगर, सुर्यवंशीनगर ताजोद्दीन बाबा रोड, बादाडेनगर, बरकत नगर, गाजीपुरा, बालाजीनगर, सारोळा रोड, महादेवनगर, प्रबुध्‍दनगर, मणियारनगर इत्‍यादी.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलकुंभावरून खाडगाव रोड, विशाल नगर, सदाशिव नगर, चौधरीनगर,  खोरीगल्‍ली, वडारवाडा,  सुशिलादेवीनगर, साईबाबा मंदीर. आर्वी जलकुंभावरून शारदानगर, व्‍यंकटेशनगर, मदनेनगर, अर्धा केशवनगर, रेणूकानगर, उत्‍कर्ष सोसायटी, भक्‍तीनगर, रिंगरोड बायपास, सुर्यानगर, बॅंक कॉलनी.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

शुक्रवारी (ता. सात) नांदेड नाका जलकुंभावरून बौध्‍दनगर, साळेगल्‍ली, मेघराजनगर, आनंदनगर, काझीमोहल्‍ला, चिल्‍ले कॉम्‍प्‍लेक्‍स, तथागत चौक, शास्‍त्रीनगर इस्‍लामपुरा, अंजली नगर, म्‍हाडा कॉलनी इत्‍यादी. डालडा फॅक्टरी जलकुंभावरून मंठाळे नगर, मजगे नगर, पिनाटै नगर, राजश्रीनगर, हणमंतवाडी पुर्ण भाग, मोतीनगर, कोरे गार्डन, कोल्‍हेनगर, बादाडेनगर, होळकरनगर, तावरजा कॉलनी इत्‍यादी. गांधी चौक जलकुंभावरून नांदेड रोड, चंद्रनगर, कामदार रोड इत्‍यादी. आर्वी जलकुंभावरून साई रोडच्या भागात पाणी पुरवठा होणार आहे.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

शनिवारी (ता. आठ) डालडा जलकुंभ होळकर नगर, बस्‍तापुरे नगर, इस्‍लामपुरा, गांधीनगर, मोरे नगर, समता कॉलनी, क्‍वॉईल नगर, सिंहगड सोसायटी, मोची गल्‍ली, कामदार रोड, गौसपुरा, श्रीकृष्‍ण नगरए सिध्‍देश्‍वर नगर, इत्‍यादी. गांधी चौक जलकुंभावरून पोचम्‍मागल्‍ली, आझादचौक, गंजगोलाई व गाव भागाचा परिसर आदी भागात पाणी पुरवठा केला जाणार आहे.

Edited By pratap Awachar 
 

loading image