Latur : 10 वर्षापासूनची सत्ता संपुष्टात; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाच्या पॅनलचा पराभव

तालुक्यातील निकालात भाजपाचा बोलबाला
शिवाजी माने
शिवाजी माने sakal

निलंगा : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत ठाकरे गट शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या मदनसुरी ता. निलंगा येथील पॕनलचा दारूण पराभव झाला आहे. गेली दहा वर्षापासून ताब्यात असलेली सत्ता त्यांना तिसऱ्यांदा राखता आली नाही. तेथे भाजपा स्थानिक आघाडीचा विजय झाला तर निलंगा शहरालगत असलेल्या दापका ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता कायम राहीली असून 'लाला पटेल' यांनी विजयाची हॕट्रीक साधली आहे.

तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी दहा वाजता येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मतमोजणीला सुरवात झाली ग्रामपंचायत निवडणूकीचा मोठा टप्पा असल्याने गर्दी होती. मदनसुरी येथील ग्रामपंचायतीवर गेल्या दहा वर्षापासून शिवसेना प्रमुख शिवाजी माने यांची सत्ता होती यावेळी भाजपा व काँग्रेसने स्थानिक आघाडी करून त्यांचा पॕनलचा गावातच पराभव केला. त्यांना स्वतःचे गावातील सत्ता राखता आली नाही. निलंगा शहरालगत असलेल्या दापका ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते येथे भाजपाकडून देशमुख तर काँग्रेसकडून 'लाला पटेल' यांच्यात सरळ लढत झाली या निवडणूकीकडे मिनी नगरपालीका म्हणून पाहीले जात होते.

अखेर लाला पटेल यांनी विजयाची हॕट्रीक साधत पुन्हा एकदा सत्ता काँग्रेसकडे खेचून आणत तिसऱ्यांदा सत्ता कायम ठेवली. तर गेल्या अनेक वर्षापासून कायम काँग्रेसकडे राहीलेल्या मुगाव ग्रामपंचायत भाजपाकडे गेली आहे. जिल्हापरिषद व पंचायत समितीची सत्ता सुरेंद्र धुमाळ यांच्याकडे ळ अनेक वर्षापासून ग्रामपंचायत ताब्यात होती काँग्रेस पक्षाला सतत या गावातून हजारो मताची लिड असायची मात्र यावेळी गावातील तरूणांनी काँग्रेसची सत्तेला सुरूंग लावला आहे. तर निटूर ग्रामपंचायतीवर भाजपा विजयी झाले आहे. तेथील सरपंच परमेश्वर हासबे यांच्या पॕनलचा पराभव झाला आहे. एकंदरीत झालेल्या मतमोजणीत भाजपाचा बोलबाला अधिक झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com