मुंबई, पुण्याला मागे टाकत लातूरचे आयटीआय प्रथम

Latur ITI in first rank
Latur ITI in first rank

लातूर - केंद्र शासनाच्या डायरेक्टर जनरल आॅफ ट्रेनिंग यांनी
राज्यातील ३५३ शासकीय आयटीआयची `क्रिसील` कंपनीकडून तपासणी केली होती. यात त्यांनी नुकतेच मानांकन जाहीर केले आहे. यात मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक सारख्या प्रगत शहरातील आयटीआयला मागे टाकत राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. लातूरच्या आयटीआयला २.७८ इतके ग्रेडिंग मिळाले आहे. लातूरच्या शिक्षणाच्या पॅटर्नमध्ये आता आयटीआयने देखील मानाचा तूरा खोवला आहे.

केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या वतीने जानेवारी २०१७ ते आक्टोबर २०१७ या कालावधीत विविध टप्प्यात राज्यातील ३५३ आयटीआयची `क्रिसील` कंपनीकडून तपासणी केली होती. या तपासणीत प्रामुख्याने आयटीआयमध्ये उपलब्ध असणारी साधने, प्रशिक्षणाचा दर्जा, प्रशिक्षकांची गुणवत्ता, शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरीचे मिळणारे प्रमाण यासह ४३ बाबींचे मूल्यांकन करण्यात आले होते. ही तपासणी होण्यापूर्वीच येथील आयटीआयने प्रयत्नपूर्वक आयएसओ गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले होते. त्यामुळे मानांकनाच्या प्रक्रियेस या आयटीआयला सहज सामोरे जाता आले आहे. या करीता संस्थेचे प्राचार्य प्रविणकुमार उखळीकर, उपप्राचार्य आर. एम. परांडे, पी. एस. शेटे, सुनील जाधव, श्रीमती रणभिडकर, श्री. सोनवणे, श्री. बजाज, श्री. पांडे, श्री. आकडे, श्री. गायकवाड या सर्व गटनिदेशकांनी पुढाकार घेतला होता. या तपासणीत संस्थेचे अंतर्गत व बाह्य मूल्यांकनही करण्यात आले आहे. या कंपनीने विद्यार्थ्यांना मिळालेल्या नोकऱीच्या ठिकाणच्या कंपन्यांशी संपर्क साधूनही या आयटीआयबद्दलची माहिती करून घेतली होती. विद्यार्थ्यांशी चर्चा केली.
त्यातून या आयटीआयला २.७८ ची ग्रेडिंग देण्यात आली आहे. राज्यात मुंबई,
पुणे, नाशिक सारख्या प्रगत आयटीआयला मागे टाकत ग्रामीण भागातील या
आयटीआयने राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. राज्यातील इतर आयटीमध्ये शिराळा (जि. सांगली) २.७२, बीड २.६३, नाशिक २.६०,  पुणे २.४४, कोल्हापूर २.४०, अंबरनाथ २.३७, ठाणे मुलींचे २.३४, एससीपी (नाशिक) या आटीआयला २.३४ ग्रेडिंग मिळाली आहे. इतर आयटीआय हे एक ते दोन ग्रेडिंगमध्येच राहिले आहेत.

या आयटीआयमध्ये ग्रामीण भागातील मुले, मुली शिक्षण घेत आहेत. त्यांना आहे. त्या साधनाचा वापर करून गुणवत्ता पूर्वक शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नोकरी लागलण्याचे प्रमाण वाढले आहे. या करीता कौशल्य विकास खात्याचे मंत्री व पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रोत्साहन दिले. गटनिदेशक, निदेशकांचे परिश्रमही कामी आले. यातून हे मानांकन मिळाले आहे. हे सातत्य टिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- प्रविणकुमार उखळीकर, प्राचार्य, शासकीय आयटीआय, लातूर

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com