लातूर : पावसाने घरे पडल्यामुळे पाच कुटुंबे उघड्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Latur Jalkot house collapse continious heavy rain water

लातूर : पावसाने घरे पडल्यामुळे पाच कुटुंबे उघड्यावर

जळकोट - तालुक्यातील केकतसिंदगी व चाटेवाडी येथे सतत पडत असलेल्या पावसामुळे गावांतील पाच कुटुंबांची घरे पडल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. त्यांना तत्काळ निवारा द्यावा, अशी मागणी होत आहे,

तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर केकतसिंदगी येथील कमलाबाई विश्वनाथ हंगरगे, वंदना भाऊराव हंगरगे व चाटेवाडी येथील माधव चोले, पंढरी चोले, गणपती चोले यांची घरे पडली आहेत. त्यामुळे कुटुंबांवर दुसरा आसरा नसल्याने कुठे राहावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

चाटेवाडी, केकसिंदगी गावाबरोबर अन्य गावांतही घराची पडझड झाली आहे. तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना पाठवून पंचनामे करून घेतले आहेत. शासनाने संबंधित कुटुंबांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Latur Jalkot House Collapse Continious Heavy Rain Water Kekatsindagi Chatewadi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top