esakal | ‘मांजरा’च्या कालव्यातील मोटारी, इंजीन जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

water canal

‘मांजरा’च्या कालव्यातील मोटारी, इंजीन जप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर: गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून मांजरा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातील अनधिकृत पाण्याचा उपशाचा विषय चर्चेत आहे. यावर ‘सकाळ’ने सातत्याने प्रकाश टाकला आहे. अखेर जलसंपदा विभागाच्या वतीने अशा अनधिकृत पाण्याचा उपसा करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. यात पोलिस बंदोबस्तात पथकाने कालव्यातील विद्यूत मोटारी, इंजीन, पाइप तसेच सायफनचे साहित्य जप्त केले आहे.

मांजरा धरणात यावर्षी मुबलक पाणीसाठा असल्याने यावर्षी धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. पण, हे पाणी कालव्याच्या शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत जात नाही. वरच्या भागात कालव्यातून मोठ्या प्रमाणात अनधिकृत पाण्याचा उपसा केला जात आहे. विद्युत मोटारी, इंजिन, होसपाइप, सायफनचा वापर करून हा पाण्याचा उपसा केला जात आहे. यावर ‘सकाळ’ने सातत्याने प्रकाश टाकला आहे. त्यानंतर पालकमंत्री अमित देशमुख यांनीदेखील याची दखल घेतली.

हेही वाचा: Mental health: 'अति विचार टाळून नॉर्मल रहा'

लातूर तसेच मुंबईत या संदर्भात बैठक घेऊन जलसपंदा विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. काही दिवसापूर्वी येथे झालेल्या बैठकीत सात दिवसात कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. अखेर गेल्या दोन तीन दिवसापासून उजव्या कालव्यात जलसंपदा विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात येत आहे. जलसंपदा विभागाच्या वतीने कानडी बोरगाव, तांदूळजा, गाधवड, वांजरखेडा, कासारजवळगा, रुई रामेश्वर, दिंडेगाव आदी गावात ही कारवाई करण्यात आली आहे. यात ४० शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी, इंजिन, सायफन तसेच होस पाइप काढून ते जप्त करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा विरोध पाहता पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली आहे.

loading image