उघड्या संसारावर उभारली समाधानाची गुढी, मेंढपाळांचा असाही गुढी पाडवा...

mendhpal gudipadhva.
mendhpal gudipadhva.

उजनी (लातूर): टाका (ता. औसा) परिसरात काही दिवसांपासून शेतात मुक्कामाला असलेल्या मेंढपाळांनी अगदी रूढी परंपरेनुसार गुढी उभारून मंगळवारी (ता.१३) आनंदाने गुढी पाडवा सण साजरा केला. उघड्यावर संसार थाटून, आहे ती परिस्थिती जशास तशी स्वीकारून, कसल्याही प्रकारची अपेक्षा न करता, अडी अडचणी वर मात करत या मेंढपाळ कुटुंबांनी एकप्रकारे समाधानाची गुढी उभारली असल्याचे पाहायला मिळाले. 

धनगर समाजातील बहुसंख्य मेंढपाळ आपल्या शेळ्या-मेंढ्यासह शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील राशी पूर्ण झाल्यानंतर चारा तिथं निवारा घेत मजल दरमजल करत काळ्या रानावर मुक्काम करतात. रब्बीची पीकं निघाल्यावर रानं मोकळी होतात. तिथं मेंढरं चरतात. सोबत शेताला खत मिळतो. त्यामुळे आपल्या शेतात मेंढरांनी मुक्काम करावा यासाठी शेतकरी स्वत:हून मेंढपाळांना बोलावतात.

उन्हाळ्यात सोलापूर आणि साताऱ्यातले मेंढपाळ दरवर्षी मराठवाड्याचा मोठा दौरा करतात. त्यांच्यासोबत शेळ्या मेंढ्याच्या कळपासह लागणारे संसारपयोगी साहित्य, जीवनावश्यक वस्तू, कोंबड्या, कुत्री, आदीं प्राण्यांसह लहान मुले आणि त्यांच्या अर्धांगिनीचा एका शिवारातून दुसऱ्या शिवारात उघड्या रानावर मुक्काम करत प्रवास सुरू असतो.

अशी काही मेंढपाळ कुटुंबं येथील टाका शिवारात मुक्कामाला आहेत. त्या कुटूंबानी मंगळवारी उघड्या रानावर थाटलेल्या संसारात पारंपरिक गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सोमवारी (ता.१२) रात्री या परिसरात वाऱ्यासह रिमझिम पाऊस झाला. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी संस्कृतीचे जतन करत आनंदाने सण साजरा केल्याने येथील ग्रामस्थांमधून त्यांचे कौतुक केले जात आहे.

आमच्या घराशेजारी काही मेंढपाळांनी मुक्काम केला आहे. रात्रीच्या पावसातही त्यांनी तसाच उघड्यावर मुक्काम केला. घर नसताना ऊन, पाऊस, वारा सहन करत लहान मुलाबाळासह शेतावर वनवण करत असताना देखील आनंदाने गुढीपाडवा साजरा करत त्यांनी संस्कृतीचे जतन केल्याचे पाहून कौतुक वाटले.

-सूर्यकांत तोळमारे, रहिवाशी, टाका
 

(edited by- pramod sarawale) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com