जळकोटात महिलाराज! पंधरा गावच्या सरपंचपदी तर सात गावच्या उपसरपंचपदी महिलांची बाजी

sarpanch jalkot
sarpanch jalkot

जळकोट (लातूर): तालुक्यात पहिल्या टप्प्यातील २७ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडी पार पडल्या असून यामध्ये महिला उमेदवारांना मोठा वाटा मिळाला असल्याचे दिसून आले आहे. निवडणूक झालेल्या पंधरा गावच्या सरपंचपदी तर सात ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महिला उमेदवार विराजमान झाल्या आहेत. पदाधिकारी निवडीनंतर आता गाव विकासाच्या आशा पल्लवित झाल्या असून आश्वासनाच्या पूर्ततेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

एकूण ४७ ग्रामपंचायतीपैकी २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात पार पडल्या.  त्यात १५ ठिकाणी सरपंचपदी महिलांना संधी मिळाली आहे. शिल्लक दहा गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुरुष विराजमान झाले आहेत.

यामध्ये मेवापूरच्या सरपंचपदी कोमल पाटील तर उपसरपंचपदी गौतम गायकवाड, शेलदरा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी जयश्री मुसळे तर उपसरपंचपदी संगीता हासुळे, चिंचोलीच्या सरपंच पदी रेखा बिरादार तर उपसरपंचपदी राजेंद्र बंडरे , मरसांगवी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी पूजा गोरखे तर उपसरपंचपदी शादुल शेख , डोंगरगाव च्या सरपंचपदी ललिता सातपूरे तर उपसरपंचपदी सुनील बिरादार, शिवाजीनगर तांडा सरपंचपदी जयश्री राठोड तर उपसरपंचपदी रमेश जाधव, बोरगाव (खुर्द ) सरपंचपदी रागिनी केंद्रे तर उपसरपंचपदी शिवाजी केंद्रे , तिरुका सरपंचपदी नरसा  सगर तर उपसरपंचपदी मारोती पांडे, येलदरा ग्रामपंचायत सरपंचपदी आशा सूर्यवंशी तर उपसरपंचपदी किरण पुरी,  कोळनुर गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संध्या चोले तर उपसरपंच पदी तुळशीदास पांचाळ, पाटोदा (खुर्द ) सरपंचपदी ललिता गीते तर उपसरपंच पद हे रिक्त आहे. रावणकोळा या गावच्या  ग्रामपंचायत सरपंचपदी ज्योत्स्ना दळवे तर उपसरपंचपदी सुनील राठोड, धामणगावच्या सरपंचपदी सुनिता कल्पले तर उपसरपंचपदी अर्जुन आगलावे, कुणकीच्या सरपंचपदी अनिता वाघमारे तर उपसरपंचपदी वसंत येनाडले , विराळ ग्रामपंचायत च्या सरपंचपदी सरोजा पवार तर उपसरपंचपदी किशन सोनटक्के.

या पंधरा गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महिलांनी बाजी मारली आहे. उर्वरित दहा गावच्या ग्रामपंचायत च्या सरपंचपदी पुरुष विराजमान झाले आहेत. त्यामध्ये बेळसांगवीच्या सरपंचदी जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे तर उपसरपंचपदी मिनाबाई वाघमारे, अतनूर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी चंद्रशेखर पाटील तर उपसरपंचपदी बाबू कापसे, गव्हाणच्या सरपंचपदी बालाजी गुडसुरे तर उपसरपंचपदी शीतल कुंजटवाड, सुल्लाळीच्या सरपंचपदी राजू चव्हाण तर उपसरपंचपदी शिवानंद गायकवाड, घोण्सीच्या सरपंचपदी शरद कोकणे तर उपसरपंचपदी दत्ता घोणसीकर, एकुरका (खु.) सरपंचपदी पांडुरंग केंद्रे तर उपसरपंचपदी पार्वती जायभाये , वांजरवाडाच्या सरपंचपदी अविनाश नळंदवार तर उपसरपंचपदी भागिरथाबाई वाघमारे, डोंगरकोनाळीच्या सरपंचपदी पंकज शिंदे तर उपसरपंचपदी शीतल कवठाळे , सोनवळाच्या सरपंचपदी राहुल सूर्यवंशी तर उपसरपंचपदी पांडुरंग सूर्यवंशी, लाळी (खु.) सरपंचपदी निलेश नाईक तर उपसरपंचपदी सूर्यकांत हालकरे  यांची बिनविरोध निवड झाली आहे

हाळदवाढवणा वडगाव रिक्त-

हळदवाढवणा व वडगाव येथील सरपंचपद रिक्त असल्यामुळे निवडीचा पुढील आदेश येईपर्यंत उपसरपंच या गावचा गाडा हाकणार आहेत. हळद वाढवण्याच्या उपसरपंचपदी सत्यवान पाटील व वडगावच्या उपसरपंचपदी वंदना मुंडे यांची निवड झाली आहे.

सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडी पार पाडण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार संदीप कुलकर्णी, नायब तहसिलदार राजाभाऊ खरात, धनश्री स्वामी, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे तसेच संबंधित  नियुक्त अध्यासी अधिकारी यांनी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली आहे.

विकासासाठी आशा पल्लवित

पदाधिकारी निवडीनंतर आता या २७ गावातील विकासासाठी ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अनेक गावात पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी योजना आवश्यक आहे. तसेच अनेक प्रश्न व विकास अपेक्षित आहे. त्यात अनेकांनी निवडणुकीत आश्वासने दिली आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता आश्वासनाच्या पूर्ततेकडे लागले आहे.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com