'निलंग्यात शिवजयंती जंगी करणार' शिवप्रेमींचा निर्धार

shivjayanti
shivjayanti

निलंगा (लातूर): शुक्रवारी (१९ फेब्रुवारी) रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निलंगा येथे आक्का फाऊंडेशनच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती युवानेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी दिली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने विविध नियम व अटी घालून सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्यावर बंधने घातली असली तरी निलंग्यात यंदा नियम पाळून जंगी शिवजयंती होणार आहे.

सार्वजनिक शिवजन्मोत्सव २०२१ ची आढावा बैठक  जिजाऊ सृष्टी येथे अरविंद पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. मागच्या दोन तीन वर्षापासून निलंगा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वेगवेगळ्या पध्दतीने साजरी केली जात आहे. सन २०१९ साली पर्यावरणाचा संदेश देणारी हरीत शिवजयंती तर सन २०२० मध्ये विविध संकल्प घेणारी शिवजयंती साजरी करण्यात आली. तीच परंपरा कायम राखत यंदाही आक्का फाऊंडेशनच्या वतीने अरविंद पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे.

गुरूवारी ता. १८ रोजी प्रसिद्ध अभिनेते अवधूत गुप्ते यांचा 'शिवगर्जना' हा कार्यक्रम तर शुक्रवारी ता. १९ रोजी मराठी अभिनेते भरत जाधव यांचा प्रसिद्ध असा नाटक 'पुन्हा सही रे सही' सादर होणार आहे. या शिवजयंतीच्या निमित्ताने आरोग्याविषयी जनजागृतीसाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले आहे. वय वर्ष ५ ते ५० या वयोगटात ही स्पर्धा असणार आहे. त्याच दिवशी दुपारी व्याख्यान आणि संध्याकाळी शिवगर्जना कार्यक्रम असेल. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. शासनाने जयंती साजरी करण्यासाठी जाचक आटी घातल्या असून हा आदेश मागे घ्यावा याचा आम्ही निषेध करीत आहोत. अशी मागणी शिवभक्तांच्या वतीने करण्यात येत आहे.

या बैठकीसाठी यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, सभापती महादेव फट्टे, नगरसेवक इरफान सय्यद, शंकरापा भुरके, डॉ. किरण बाहेती, मराठा सेवा संघाचे जिल्हाकार्याध्यक्ष एम. एम. जाधव, सेवा संघाचे तालुकाध्यक्ष डॉ हंसराज भोसले, डॉ. लालासाहेब देशमुख, दत्ता शाहीर, प्रा. दयानंद चोपणे, विलास सुर्यवंशी, रजनीकांत कांबळे, विनोद सोनवणे, रोहित बनसोडे, आरुण साळुंके, महेश ढगे, सुमित इनानी, जाकेर शेख अदी उपस्थित होते.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com